RCB vs KKR : आरसीबीला सूचक इशारा देत रिंकू सिंगनं वातावरण तापवलं, फोटो पोस्ट करत दिलं चॅलेंज
Rinku Singh : आयपीएलमध्ये आरसीबी आणि केकेआर आज आमने सामने येणार आहेत. या मॅचपूर्वी रिंकू सिंगनं एक फोटो पोस्ट करत सूचक इशारा दिला आहे.
![RCB vs KKR : आरसीबीला सूचक इशारा देत रिंकू सिंगनं वातावरण तापवलं, फोटो पोस्ट करत दिलं चॅलेंज rcb vs kkr rinku singh post photo indicating i am hungry warning to royal challengers bengaluru RCB vs KKR : आरसीबीला सूचक इशारा देत रिंकू सिंगनं वातावरण तापवलं, फोटो पोस्ट करत दिलं चॅलेंज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/29/51032ae2a92509ce9ce453fd618c8e931711698030003989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बंगळुरु :आयपीएल (IPL 2024)मध्ये आज बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengalur) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आमने सामने येतील. बंगळुरुच्या आतापर्यंत दोन मॅचेस झालेल्या आहेत. तर, कोलकाताची एक मॅच झालेली आहे. या मॅचपूर्वी कोलकाताचा बॅटसमन रिंकू सिंगनं (Rinku Singh) आरसीबीला इशारा दिला आहे
रिंकू सिंगनं एक फोटो पोस्ट करत आरसीबीला इशारा दिला आहे. आय एम हंग्री असं लिहिलेलं स्टीकर असणारी बॅट रिंकू सिंगनं हातात धरुन आरसीबीविरुद्धच्या मॅचपूर्वी आपले इरादे सप्ष्ट केले आहेत.
रिंकू सिंग केकेआरचा प्रमुख फलंदाज आहे.रिंकूनं आयपीएलमध्ये 2017 मध्ये पदार्पण केलं होतं. मात्र, रिंकू सिंगनं 2022 आणि 2023 च्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली. रिंकू सिंगनं आयपीएलमद्ये 32 मॅचमध्ये 142.48 च्या स्ट्राइक रेटनं 35.62 च्या सरासरीनं 748 धावा केल्या आहेत. रिंकूच्या नावावर आयपीएलमध्ये चार अर्धशतकांची नोंद आहे. त्याला आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर टीम इंडियामध्ये संधी मिळाली आहे.
रिंकू सिंगवर कोलकाताची भिस्त
रिंकू सिंग आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. रिंकू सिंग कोलकाताच्या टीममध्ये लोअर मिडल ऑर्डरला बॅटिंग करत असल्यानं संघाला ज्यावेळी गरज असते त्यावेळी तो मोठी फटकेबाजी करु शकतो. आता त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला बॅट सोबतचा फोटो पोस्ट करुन इशारा दिला आहे.
केकेआर विजयाचा ट्रेंड कायम ठेवणार
शाहरुख खानच्या मालकीची टीम कोलकाता नाईट रायडर्सनं ईडन गार्डन्सवर झालेल्या मॅचमध्ये हैदराबादला पराभूत करत विजय मिळवला होता. कोलकातानं हैदराबादला चार धावांनी पराभूत केलं होतं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचा विचार केला असता. दोन्ही संघांमध्ये यापूर्वी झालेल्या मॅचमध्ये कोलकातानं विजय मिळवला होता. आता यावेळी कोलकाता विजयाचा ट्रेंड कायम ठेवणार का हे पाहावं लागेल.
आरसीबी होमग्राऊंडवरील विजयाचा ट्रेंड कायम ठेवणार?
यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या मॅचपासून नवव्या मॅचपर्यंत ज्या टीमच्या होम ग्राऊंडवर मॅच झालेली आहे. त्यांनी विजय मिळवला आहे. आज आरसीबीचं होम ग्राऊंड असलेल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर मॅच होत आहे. या मॅचमध्ये विजय मिळवून आरसीबी होम ग्राऊंडवरील विजयाचा ट्रेंड कायम ठेवणार का हे पाहावं लागेल. याशिवाय कोलकाताकडून यापूर्वी सलग पाचवेळा झालेल्या पराभवाचा बदला देखील आरसीबीची टीम घेऊ शकते. केकेआर आणि आरसीबी यांच्यामधील एक टीम आजच्या मॅचमध्ये विजय मिळाल्यास गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचू शकते.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)