एक्स्प्लोर

IPL 2023 : RCB संघाला मोठा झटका! 'हा' स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर; गुजरात विरुद्ध सामन्याआधी अडचणी वाढल्या

Josh Hazlewood out from IPL 2023 : प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आरसीबीच्या संघाला गुजरात विरुद्ध विजय मिळवावा लागेल. पण याआधी आरसीबी संघातील स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर गेला आहे.

RCB vs GT, Josh Hazlewood Ruled Out : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाला गुजरात टायटन्स (GT) विरुद्धच्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. आरसीबी संघ सध्या 'करो या मरो' च्या सध्याच्या परिस्थितीत असताना आजच्या सामन्यापूर्वी संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आरसीबीचा स्टार गोलंदाजाला दुखापत झाली आहे.

आरसीबीच्या स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड (Josh Hazlewood) दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे तो गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. हेजलवूडच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली आहे. आरसीबीचे संचालक माईक हेसन यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, हेजलवूड मायदेशी परतणार आहे. त्यामुळे प्लेऑफआधीच्या महत्त्वाच्या सामन्याला हेजलवुड मुकणार आहे.

जोश हेजलवुड आयपीएलमधून बाहेर

आता या स्टार वेगवान गोलंदाजाचे प्लेऑफपूर्वी बाहेर पडणं आरसीबीसाठी मोठा धक्का आहे. दुखापतीमुळे जोश हेजलवुड आता आयपीएलमधून बाहेर पडला आहे. तो उपचारासाठी मायदेशी परतणार आहे. 

आरसीबीसमोरच्या अडचणी वाढत्याच

एकीकडे सामन्यावर पावसाचं सावट आहे आणि त्यात दुसरीकडे आता आरसीबीचा स्टार गोलंदाज जोश हेजलवुड आयपीएलमधून बाहेर पडल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत.

मुंबई आणि बंगळुरुमध्ये चढाओढ

आयपीएल 2023 स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आयपीएल 2023 च्या प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात प्लेऑफमधील शेवटच्या स्थानासाठी चढाओढ सुरू आहे. आज, 21 मे रोजी आरसीबीचा शेवटचा साखळी सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. हा सामना आरसीबीसाठी प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. त्याआधी हेजलवुड बाहेर गेला आहे.

आरसीबी संघाच्या चिंतेत वाढ

जोश हेझलवूडला आरसीबी (RCB) संघाने आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात 7.7 कोटी रुपयांना विकत घेतलं. आयपीएल 2022 मध्ये त्याने आरसीबीसाठी 12 सामन्यात 20 विकेट घेतल्या. यानंतर, आयपीएल 2023 च्या सुरुवातीला तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याने 1 मे रोजी आयपीएल 2023 मध्ये पहिला सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळला. मात्र आता तो पुन्हा जखमी होताच आरसीबीच्या अडचणी वाढल्या आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

RCB vs GT : आरसीबीची चिंता वाढली! बंगळुरुमध्ये पावसाची हजेरी; आजच्या सामन्यावर पावसाचं सावट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयातWalmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवलाWalmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Embed widget