नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने, मुंबईची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
RCB vs MI Live: कर्णधार फाफ डु प्लेसिस याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.
IPL 2023, RCB vs MI Live : आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचा हा 200 आयपीएल सामना आहे. मुंबईचा संघ रोहित शर्माला विजयाची गिफ्ट देण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
आपली 𝐁𝐀𝐓𝐓𝐈𝐍𝐆 आहे! 🪙
— Mumbai Indians (@mipaltan) April 2, 2023
RCB have won the toss & they will bowl first 💪#OneFamily #RCBvMI #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL
RCB vs MI Live: मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, कॅमरून ग्रीन, तिलक वर्मा, टिम डेविड, नेहाल वढेरा, ऋतिक शौकीन, पीयूष चावला, जोफ्रा आर्चर, अरशद खान
RCB vs MI Live: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची प्लेईंग 11
विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मायकल ब्रेसवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, हर्षल पटेल, आकाश दीप, रीस टॉपले, मोहम्मद सिराज
आपली Playing XI for the first game 😍
— Mumbai Indians (@mipaltan) April 2, 2023
Paltan, how excited are you to watch us 🔙 in action? 💙#OneFamily #RCBvMI #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL @Dream11 pic.twitter.com/fg3KOjHt1I
गेल्या हंगामात आरसीबीची कामगिरी कशी ?
2022 मध्ये आरसीबीने प्लेऑफ मध्ये जागा मिळवली होती. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबीने 14 सामन्यात 8 विजय मिळवले होते तर सहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. गतवर्षी आरसीबीचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर होता. एलिमिनेटर सामन्यात आरसीबीने लखनौ सुपर जाएंट्स संघाचा 14 धावांनी पराभव केला होता. पण दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून सात विकेटने पराभव स्विकारावा लागला होता. रविवारपासून आरसीबी आपल्या यंदाच्या आयपीएलचा शुभारंभ करणार आहे. आतापर्यंत आरसीबीला एकदाही चषक उंचावता आलेला नाही. पण यंदा केजीएफ आरसीबीला चषक उंचावून देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गेल्या वर्षी मुंबईची खराब कामगिरी
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) खराब कामगिरी पाहायला मिळाली होती. मुंबई इंडियन्सच्या संघाचा 14 सामन्यांपैकी 10 सामन्यांमध्ये पराभव झाला होता, तर फक्त चार सामने जिंकता आले होते. आयपीएलच्या 15 सीझनमध्ये मुंबई संघ पहिल्यांदा पॉईट्स टेबलमध्ये खाली होता. मात्र यंदा मुंबई इंडियन्स आयपीएलच्या 16 व्या हंगामात नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे.