IPL 2022 : या खेळाडूंवर कोट्यवधी खर्च करणे चेन्नईला पडले महागात, संघाला होत असेल पश्चाताप
CSK, IPL 2022 : आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक चेन्नई संघाची यंदाच्या हंगामात निराशाजनक कामगिरी झाली आहे.
CSK, IPL 2022 : आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक चेन्नई संघाची यंदाच्या हंगामात निराशाजनक कामगिरी झाली आहे. चेन्नईला सात पराभवाचा सामना करावा लागलाय. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी चेन्नईला प्रत्येक सामना जिंकणे अनिवार्य आहे, त्याशिवाय इतर संघाच्या विजय आणि पराभवावरही अवलंबून राहावे लागणार आहे. यंदाच्या हंगामात चेन्नईची कामगिरी लाजिरवाणी झाली आहे. चेन्नईचा संघ गुणलाकिते नवव्या क्रमांकावर आहे. यासाठी बरीच कारणे असतील.. पण चेन्नईला रवींद्र जाडेजा आणि दीपक चाहर यांच्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणे महागात पडलेय. यासाठी चेन्नईला पश्चाताप होत असेल... IPL 2022 Chennai Super Kings
चेन्नईने रवींद्र जाडेजाला रिटेन केले होते. धोनीपेक्षाही जास्त पैस खर्च करुन चेन्नईने जाडेजाला संघात कायम केले होते. त्यानंतर लिलावात दीपक चाहरवरही कोट्यवधी रुपये खर्च केले होते. आयपीएलच्या 15 वर्षात चेन्नईने कधीच 10 कोटी पेक्षा जास्त बोली लावली नव्हती..दीपक चाहरसाठी चेन्नईने ही मर्यादाही ओलांडली. पण या दोन्ही खेळाडूंना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. दोन्ही खेळाडू फ्लॉप ठरले. (IPL 2022, Mega Auction)
चेन्नईने लिलावाआधी चार खेळाडूंना रिटेन केले. त्यानंतर लिलावात 21 खेळाडूंना खरेदी करत स्क्वाड तयार केला. चेन्नईने ज्या चार खेळाडूंना रिटेन केले होते, त्यामधील पहिली पसंती जाडेजाला होती. जाडेजाला चेन्नईने तब्बल 16 कोटी रुपयांत रिटेन केले होते. त्यानंतर कर्णधारपदही दिले. पण जाडेजाला संपूर्ण योगादान देता आले नाही. नेतृत्वात छाप सोडता आलीच नाही, त्याशिवाय फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्येही जाडेजा फ्लॉप ठरला. जाडेजाची खराब कामगिरी पाहून चेन्नईला पश्चाताप होत असेल.
आयपीएलच्या लिलावात चेन्ईने दीपक चाहरला 14 कोटी रुपये मोजून खरेदी केले. चेन्नईने खरेदी केलेला आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. पण दुखापतीमुळे दीपक चाहर आयपीएलमधून बाहेर देला. त्यामुळे चेन्नईची गोलंदाजी कमकुवत वाटतेय. चेन्नईला चाहरची कमी जाणवतेय.
हे देखील वाचा-
- CSK Shivam Dube : चेन्नईत आल्यावर शिवम दुबे दमदार फॉर्ममागे येण्याचं कारण काय? सुनील गावस्कर म्हणाले...
- Jadeja Ruled Out : अडचणीत असणाऱ्या चेन्नईला आणखी एक झटका, रवींद्र जाडेजा उर्वरीत आयपीएलला मुकणार
- Virat Kohli : ज्या-ज्या वेळी शून्यावर बाद त्या-त्या वेळी विराट हसत मैदानाबाहेर,कोहलीच्या या 'हास्या'मागे खरं कारण काय?