Ramandeep Singh : रमनदीप सिंगची अफलातून फिल्डींग, रसेल धावत येत असूनही कॅच पकडला, पाच सेकंदाच्या आत करेक्ट कार्यक्रम, पाहा व्हिडीओ
Ramandeep Singh : कोलकाता नाईट रायडर्सच्या रमनदीप सिंगनं अफलातून क्षेत्ररक्षण करत अर्शिन कुलकर्णीचा कॅच घेतला.
लखनौ : आयपीएलमधील 54 वी मॅच लखनौच्या एकाना स्टेडियमवर सुरु आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जाएंटस आमने सामने आले आहेत. केएल. राहुलनं टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला होता. कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Kinght Riders) सुनील नरेनच्या 81 धावांच्या खेळीवर 6 विकेटवर 235 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी लखनौकडून (Lucknow Super Giants) कॅप्टन केएल राहुल आणि अर्शिन कुलकर्णी () मैदानात उतरले. मात्र, लखनौच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. कोलकाताचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कनं अर्शिन कुलकर्णीला बाद केलं. असीन कुलकर्णी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नाता बाद झाला, त्याला रमनदीप सिंगनं घेतलेला कॅच कारणीभूत ठरला.
रमनदीप सिंगचा अफलातून कॅच, लखनौला पहिला धक्का
लखनौला अर्शिन कुलकर्णीच्या रुपानं पहिला धक्का दुसऱ्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर बसला. अर्शिन कुलकर्णीनं मिशेल स्टार्कनं टाकलेला बॉल लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅटच्या लिडींग एजला लागून बॉल कवर्सच्या दिशेनं गेला. रमनदीप उलटया दिशेनं धावत गेला. समोरुन आंद्रे रसेल धावत येत असून देखील लक्ष विचलित न होऊ देता रमनदीप सिंगनं डाय मारुन कॅच घेतला. रमनदीप सिंगला हा कॅच घेण्यासाठी पाच सेकंदापेक्षा कमी वेळ होता. रमनदीप सिंगनं कॅच घेतल्यानं लखनौला पहिला धक्का बसला अन् असीन कुलकर्णी 9 धावांवर बाद झाला. लखनौचा कॅप्टन केएल.राहुल देखील 25 धावा करुन बाद झाला आहे.हर्षित राणानं त्याची विकेट घेतली. राहुलचा कॅच देखील रमनदीप सिंगनं घेतला.
पाहा व्हिडीओ :
Judgment 💯
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2024
Technique 💯
Composure 💯
Ramandeep Singh with one of the best catches you'll see 😍👏
Watch the match LIVE on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#TATAIPL | #LSGvKKR | @KKRiders pic.twitter.com/VHoXgC0qGu
कोलकाताच्या 6 विकेटवर 235 धावा
सुनील नरेन आणि फिल सॉल्टनं कोलकाताला आक्रमक सुरुवात करुन दिली. फिल सॉल्ट 32 धावांवर बाद झाला.रवि बिश्नोईनं कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर सुनील नरेन याला 81 धावांवर बाद केलं. आंद्र रसेल 12 धावा करुन बाद झाला. अंगकृष रघुवंशी 32 धावा, रिंकू सिंग 16 धावा, श्रेयस अय्यर 23 धावा, रमनदीप सिंगनं 25 धावा केल्या.कोलकाता नाईट रायडर्सनं 20 ओव्हरमध्ये 6 विकेटवर 235 धावा केल्या आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जाएंटस आयपीएलमध्ये आतापर्यंत चारवेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये लखनौनं तीन वेळा मॅच जिंकली आहे. तर, कोलकातानं एकदा मॅच जिंकली आहे.
संबंधित बातम्या :
CSK vs PBKS : चेन्नई सुपर किंग्जचा पंजाब किंग्जला दणका,28 धावांनी दणदणीत विजय, गुणतालिकेत उलटफेर