(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajat Patidar : पत्रिका छापल्या, पाहुण्यांनाही आमंत्रण, आरसीबीकडून आला फोन अन् पाटीदारने लग्न थांबवले
Rajat Patidar RCB, IPL 2022 : फेब्रुवारीमध्ये झालेल्या मेगा लिलावात रजत पाटीदारवर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती.. रजत पाटीदारने 9 मे रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
Rajat Patidar RCB, IPL 2022 : आयपीएलच्या मेगा लिलावात अनसोल्ड ठरलेला हाच रजत पाटीदार...15 व्या मोसमातल्या एलिमिनेटर सामन्यात मात्र हीरो ठरला. रजतच्या नाबाद शतकानं या सामन्यात बंगलोरला धावांचा डोंगर उभा करुन दिला. पाटीदारच्या शतकाच्या बळावर लखनौला हरवून बंगलोरचा संघ क्वालिफायरच्या दुसऱ्या लढतीसाठी पात्र ठरला. रजतनं अवघ्या 54 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकारांसह 112 धावा फटकावल्या. तेही तब्बल 207.41 च्या स्ट्राईक रेटनं. पण गम्मत अशी आहे की, फेब्रुवारीत झालेल्या आयपीएलच्या मेगा लिलावात हाच रजत पाटीदार चक्क अनसोल्ड ठरला होता. एकाही फ्रँचायझीनं त्याच्यावर बोली लावली नव्हती. पण आरसीबीचा लवनीत सिसोदिया जखमी झाला. त्याच्याजागी रजत पाटीदार संघात आला.
आरसीबीकडून आयपीएलमध्ये खेळण्यासाठी फोन आल्यानंतर बोहल्यावर चढणाऱ्या रजत पाटीदारने लग्न थांबवले...पाटीदारच्या वडिलांनी न्यू इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'जतचं 9 मे रोजी लग्न होतं... सर्व पाहुण्यांना पत्रिका पाठवण्यात आल्या होत्या. हॉटेलही बूक करण्यात आले होते.. सर्व तयारी झाली होती. तेव्हाच आयपीएलमध्ये खेळण्यासाठी रजतला फोन आला.. त्यावेळी त्याने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.. अन् तो आयपीएलच्या मैदानात परतला.'
फेब्रुवारीमध्ये झालेल्या मेगा लिलावात रजत पाटीदारवर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती.. रजत पाटीदारने 9 मे रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आरसीबीने लिलावातही पाटीदारवर बोली लावली नव्हती. पण लवनीथ सिसोदिया दुखापतग्रस्त झाल्यामुळे तीन एप्रिल रोजी पाटीदारला आरसीबीकडून बोलवणं आले. पाटीदारला 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीत खरेदी करण्यात आले.
यंदाच्या हंगामात रजत पाटीदारने तुफानी फटकेबाजी केली आहे. पाटीदारने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 156.25 च्या स्ट्राइक रेटने धावांचा पाऊस पाडलाय. पाटीदारने सात सामन्यात 275 धावांचा पाऊस पाडलाय. 29 वर्षांचा रजत पाटीदार मूळचा मध्य प्रदेशच्या इंदूरचा आहे.. वयाच्या आठव्या वर्षी तो क्रिकेट अॅकॅडमीत दाखल झाला. 2015-16 च्या रणजी मोसमात रजतनं आपल्या प्रथम श्रेणी कारकीर्दीला सुरुवात केली. तर 2018 मध्ये त्यानं मध्य प्रदेशकडून आपला पहिला टी20 सामना खेळला. 2021 च्या मोसमात बंगलोरकडूनच त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.आयपीएल 2021 मध्ये पाटीदारने 4 सामन्यात 71 धावा केल्या होत्या.