एक्स्प्लोर

आयपीएलच्या मैदानात भिडणार पंजाब अन् राजस्थान? कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड आकडेवारी

PBKS vs RR Head to Head: आज आयपीएल 2023 च्या मैदानात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात रंगणार सामना.

PBKS vs RR Preview: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये आज 66 वा सामना पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात संध्याकाळी 07:30 वाजता खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघ आजचा सामना जिंकून आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आपली अंधुकशी आशा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघांचे 13 सामन्यांत समान 12 गुण आहेत, पण उत्तम रनरेटच्या आधारावर राजस्थानचा संघ पंजाबपेक्षा पुढे आहे. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात, पण त्यासाठी त्यांना आजच्या सामन्यासोबतच इतर संघांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावं लागेल. 

कोणत्या संघाचं पारडं जड? 

आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत 25 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान राजस्थाननं 14 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे पंजाबनं 11 सामने जिंकले आहेत. मात्र, 16व्या मोसमात पंजाबनं केवळ एकच सामना जिंकला आहे. त्यामुळे राजस्थानचा वरचष्मा दिसत आहे. पण यावेळी आरआर आपला दबदबा कायम ठेवणार की पंजाब दुहेरी हेडरवरही विजय मिळवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

हेड टू हेड आकडेवारी 

25 सामने 

पंजाब किंग्स  11 विजय राजस्थान रॉयल्स  14 विजय
पंजाब किंग्स  14 पराभव  राजस्थान रॉयल्स  11 पराभव 
सर्वश्रेष्ठ स्कोर 223 सर्वाधिक स्कोअर 226
सर्वाधिक कमी स्कोअर 124 सर्वाधिक कमी स्कोअर 112

PBKS vs RR IPL 2023: अशी असू शकते पंजाब विरुद्ध राजस्थान टीमची प्लेईंग-11 

पंजाब किंग्सचा संभाव्य संघ 

शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, सॅम करन, लियम लिविंगस्टोन, प्रभसिमरन सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), राहुल चाहर, हरप्रीत बरार, अर्शदीप सिंह, नाथन एलिस, कगिसो रबाडा

राजस्थान रॉयल्सचा संभाव्य संघ 

यशस्वी जायस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), देवदत्त पाडिक्कल, केएम आसिफ, शिमरन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

PBKS vs RR Playing 11: प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी राजस्थानला जिंकावंच लागेल, अशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग 11

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Umar Khalid Bail Denied: 'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, संतोष धुरी यांचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरींचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, भाजप प्रवेश ठरला

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Umar Khalid Bail Denied: 'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, संतोष धुरी यांचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरींचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, भाजप प्रवेश ठरला
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
Embed widget