RCB Vs RR Playing 11 : आजचा सामना राजस्थानसाठी महत्त्वाचा; बंगळुरुवर मात करणार?
Rajasthan Royals Vs Royal Challengers Banglore : आज आयपीएलच्या मैदानात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरु यांच्यात सामना रंगणार आहे.
Rajasthan Royals Vs Royal Challengers Banglore : इंडियन प्रीमियर लीग सीझन 14च्या 43व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सची टक्कर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसोबत होणार आहे. दुबई इंटरननॅशनल स्टेडिअममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा प्रयत्न प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्याचा असेल. तर विराट कोहलीच्या नेतृत्त्वात खेळणारा बंगळुरुचा संघ आजचा सामना जिंकून प्लेऑफच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेल.
राजस्थान रॉयल्ससाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. राजस्थानला आतापर्यंत 10 पैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे. राजस्थान रॉयल्सनं जर आजचा सामना गमावला, तर प्लेऑफमध्ये सहभागी होण्याची शक्यता फार कमी आहे. राजस्थानच्या संघासाठी त्यांची मीडल ऑर्डर समस्या ठरत आहे. लिविंगस्टोन, पराग आणि तेवतिया तिनही खेळाडू यंदाच्या सीझनमध्ये फारशी चांगली कामगिरी करु शकले नाहीत. राजस्थान रॉयल्स यापैकी एखाद्या खेळाडू आजच्या सामन्यात संघाबाहेर ठेवू शकतं. तर कार्तिक त्यागी सध्या दुखापतीनं त्रस्त आहे आणि त्याच्याऐवजी आजच्या सामन्यात उनादकट खेळणार असल्याचं निश्चित झालं आहे.
पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आरसीबी
विराट कोहलीच्या नेतृत्त्वात खेळणारा आरसीबीचा संघ या सीझनमध्ये चांगलाच फॉर्मात आहे. आरसीबी 10 सामन्यांत 12 पॉईंट्स मिळवले आहेत. आजच्या सामन्यात आरसीबी आणखी दोन पॉईंट्स कमावण्यासोबतच नेट रन नेट सुधारण्यावर असेल. हे त्यांच्यासाठी प्लेऑफच्या शर्यतीसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. आरसीबीचा संघाचा बँलंस अत्यंत उत्तम आहे. राजस्थान रॉयल्सच्या विरोधातील सामन्यात बंगळुरूच्या संघात बदल होण्याची शक्यता धूसर आहे.
दोन्ही संघांचे संभाव्य संघ :
RCB Playing 11 : विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भारत (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स, शाहबाज अहमद, डेनियल क्रिश्चियन/ टिम डेविड, काइल जॅमीसन, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
RR Playing 11: संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), एविन लुईस, यशस्वी जायसवाल, लियाम लिविंगस्टोन/डेविड मिलर, महिपाल लोमरोर, रियान पराग/शिवम दुबे, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, मुस्तफिजूर रहमान, चेतन सकारिया, जयदेव उनादकट.