एक्स्प्लोर

Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score: 8 षटक, 36 धावा, 3 विकेट्स; 'रियान पराग' नावचं तुफान अन् 185 धावांवर राजस्थानची मजल

Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score: राजस्थान रॉयल्स (RR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यातील सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जात आहे.

Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score: राजस्थान रॉयल्स (RR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यातील सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण वाटत होते, तरीही राजस्थानने 185 धावा केल्या. 

राजस्थानने 8 षटकांत 36 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स गमावल्या होत्या, पण अशा परिस्थितीत रियान परागने अर्धशतक झळकावून संघाला संकटातून वाचवले. रियान परागने 45 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकारांसह 84 धावांची खेळी केली. दरम्यान, रविचंद्रन अश्विननेही 19 चेंडूत 3 षटकार लगावत 29 धावांची शानदार खेळी केली. राजस्थानने आक्रमक फलंदाजी करत शेवटच्या 5 षटकांत 77 धावा केल्या.

दिल्लीपुढं 186 धावांचे लक्ष्य 

राजस्थान रॉयल्सने प्रथम खेळताना 185 धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल पहिल्याच चेंडूपासून अडचणीत दिसली आणि केवळ 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. जॉस बटलरची बॅट सलग दुसऱ्या सामन्यात शांत राहिली, त्याने केवळ 11 धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसनने सुरुवात चांगली केली, पण 14 चेंडूत केवळ 15 धावा करून तो बाद झाला. रविचंद्रन अश्विन आणि रियान पराग यांच्यातील 54 धावांच्या भागीदारीने राजस्थान संघाला सावरले. 15 षटकांनंतर संघाची धावसंख्या 108 धावा होती, मात्र शेवटच्या 5 षटकांत रियान परागने दिल्लीच्या गोलंदाजांची चांगलीच कोंडी केली. राजस्थान रॉयल्सने शेवटच्या 5 षटकात एकूण 77 धावा केल्या आहेत. त्याच्यासोबत शिमरॉन हेटमायरनेही 7 चेंडूत चौकार आणि षटकारांसह 14 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात ॲनरिक नॉर्टजेने 25 धावा दिल्या. त्यामुळे संघाची धावसंख्या 185 पर्यंत पोहोचली.

दिल्लीच्या सर्व गोलंदाजांनी विकेट घेतल्या

दिल्ली कॅपिटल्सची पहिली विकेट मुकेश कुमारने घेतली, ज्याने यशस्वी जैस्वालला क्लीन बोल्ड केले. खलील अहमदने अप्रतिम गोलंदाजी करत 4 षटकात 24 धावा देत 1 बळी घेतला. अक्षर पटेलनेही 4 षटकात केवळ 21 धावा देऊन 1 बळी घेतला, तर कुलदीप यादवला वाईटच फटका बसला, ज्याने 1 बळी घेतला पण 4 षटकात 41 धावा दिल्या. मुकेश कुमारने शेवटच्या 2 षटकात 30 धावा दिल्या होत्या. ॲनरिक नॉर्टजे सीझनचा पहिला सामना खेळत होता आणि त्याने 10 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावाही दिल्या.

दिल्ली कॅपिटल्सची Playing XI

डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ऋषभ पंत (w/c), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, ॲनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार

राजस्थान रॉयल्सची Playing XI

यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Hitendra Thakur : वसईवाल्यांना तिथेच निपटावू, फडणवीसांचा हितेंद्र ठाकूरांना इशाराJaipur 17 Crore Injection : लोक वर्गणीतून उभारले पैसे, 23 महिन्याच्या बाळाला दिलं 17 कोटींचं इंजेक्शनABP Majha Headlines : 11 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 14 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
Embed widget