एक्स्प्लोर

आवेश खान-बोल्टचा भेदक मारा, हैदराबादची 175 धावांपर्यंत मजल, क्लासेनचं अर्धशतक

IPL 2024 Qualifier 2:  आवेश खान आणि ट्रेंट बोल्ट यांच्या भेदक माऱ्यापुढे सनरायजर्स हैदराबादची भक्कम फलंदाजी ढेपाळली.

SRH vs RR Live Score IPL 2024 Qualifier 2:  आवेश खान आणि ट्रेंट बोल्ट यांच्या भेदक माऱ्यापुढे सनरायजर्स हैदराबादची भक्कम फलंदाजी ढेपाळली. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेटच्या मोबदल्यात 175 धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून हेनरिक क्लासेन यानं शानदार अर्धशतक ठोकले, तर राहुल त्रिपाठीने 37 धावांची खेळी केली. राजस्थानकडून आवेश खान आणि बोल्ट यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. राजस्थानला विजयासाठी 176 धावांचे आव्हान मिळालेय. आजच्या सामन्यातील विजेता संघ 26 मे रोजी कोलकात्याविरोधात चेन्नईच्या मैदानावर खेळणार आहे. 

हैदराबादची अतिशय खराब सुरुवात -

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. हैदराबादच्या आघाडीच्या फळीला पॉवरप्लेमध्येच तंबूत धाडले.  अभिषेक शर्मा, एडन मार्करम आणि राहुल त्रिपाठी यांना तंबूत पाठवले. ट्रेंट बोल्ट यानं पहिल्याच षटकात धोकादायक अभिषेक शर्माला बाद केले. बोल्टने  हैदराबादच्या पहिल्या तीन फलंदाजांना पॉवरप्लेमध्येच तंबूत धाडले.  अभिषेक शर्मा 12, एडन मार्करम 1 आणि राहुल त्रिपाठी 37 धावांवर बाद झाले. एका बाजूला विकेट पडत असताना ट्रेविस हेड शांततेत फलंदाजी करत होता. 

राहुल त्रिपाठीचं वादळी खेळी -

अभिषेक शर्माने पाच चेंडूत एक चौकार आणि एका षटकारांच्या मदीतने 12 धावा केल्या. राहुल त्रिपाठीने छोटी पण आक्रमक खेळी केली. त्रिपाठीने 15 चेंडूमध्ये 246 च्या स्ट्राईक रेटने 37 दावांचा पाऊस पाडला. या खेळीमध्ये त्रिपाठीने दोन षटकार आणि पाच चौकार ठोकले. क्वालिफायर सामन्यात संधी मिळालेल्या मार्करमला प्रभावी कामगिरी करता आली नाही. मार्करम फक्त एका धावेवर बाद झाला.  ट्रेविस हेड याने 28 चेंडूमध्ये संथ 34 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये हेडने तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. पॅट कमिन्स 5 आणि जयदेव उनादक 5 धावा केल्या.

हेनरिक क्लासेनची एकाकी झुंज -

ठरावीक अंतराने विकेट पडत असतानाही हेनरिक क्लासेन याने आपलं काम चोख बजावले. क्लासेन याने 34 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले. क्लासेन याच्या वादळी खेळीमुळेच हैदराबादचा संघ सन्मानजनक धावसंख्या उभारु शकला. क्लासेन याने 148 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली. क्लासेन याने आपल्या खेळीमध्ये चार षटकार ठोकले. नितीशकुमार रेड्डी याला फक्त पाच धावा करता आल्या. अब्दुल समद याला खातेही उघडता आले नाही. अखेरीस शाहबाद अहमद आणि पॅट कमिन्स यांनी फटकेबाजीचा प्रयत्न केला. शाहबाद अहमद याने 18 चेंडूत एका षटकारासह 18 धावा केल्या.  

राजस्थानची गोलंदाजी - 

ट्रेंट बोल्ट याने 4 षटकात 5 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत धाडले. संदीप शर्मा याने 4 षटकात फक्त 25 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. आवेश खान यानेही भेदक मारा केला. त्याने 3 फलंदाजांना तंबूत पाठवले. युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांच्या विकेटची पाटी कोरीच राहिली. 

राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेईंग 11  -

टॉम कोहलर-केडमोर, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि  युजवेंद्र चहल. 

इम्पॅक्ट प्लेयर : शिमरन हेटमायर 

सनरायजर्स हैदराबादची संभाव्य प्लेईंग 11 - 

ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, पॅट कमिंस (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, जयदेव उनादकट

इम्पॅक्ट प्लेयर : शाहबाज अहमद 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget