PBKS vs SRH IPL 2024: पंजाब किंग्सचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघाची Playing XI
Punjab Kings vs Sunrisers Hyderabad: पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनने चंदीगडच्या महाराजा यादवेंद्र सिंग स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
PBKS vs SRH IPL 2024: आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) हे संघ आमनेसामने आहेत. पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनने चंदीगडच्या महाराजा यादवेंद्र सिंग स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद प्रथम फलंदाजी करणार आहे.
🚨 Toss Update 🚨@PunjabKingsIPL elected to bowl against @SunRisers.
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2024
Follow the Match ▶️ https://t.co/JP3mpkETgx #TATAIPL | #PBKSvSRH pic.twitter.com/mJcrD1W4Ae
पंजाब किंग्सची प्लेइंग इलेव्हन-
शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरन, सिकंदर रझा, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.
Punjab Kings (Playing XI): Shikhar Dhawan(c), Jonny Bairstow, Prabhsimran Singh, Jitesh Sharma(w), Sam Curran, Sikandar Raza, Shashank Singh, Harpreet Brar, Harshal Patel, Rahul Chahar, Arshdeep Singh
सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग इलेव्हन-
ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट आणि टी नटराजन.
Sunrisers Hyderabad (Playing XI): Travis Head, Abhishek Sharma, Aiden Markram, Heinrich Klaasen(w), Abdul Samad, Nitish Reddy, Shahbaz Ahmed, Pat Cummins(c), Bhuvneshwar Kumar, Jaydev Unadkat, T Natarajan
खेळपट्टी कशी असेल?
मुल्लानपूर महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजांना सपोर्ट करणारी संतुलित आहे. पण या मैदानावर जास्त फलंदाजांना मदत मिळू शकते. फिरकी गोलंदाजापेक्षा वेगवान गोलंदाजांना जास्त विकेट मिळण्याची शक्यता आहे. या मैदानावर पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 174 धावा केल्या. दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा सामना करताना पंजाबने सनसनाटी विजय मिळवला.
गुणतालिकेत दोन्ही संघ कुठे आहेत?
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद 4 सामन्यांत 4 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. याचबरोबर शिखर धवनचा पंजाब किंग्ज 4 सामन्यांत 2 विजयांसह सहाव्या स्थानावर आहे. वास्तविक, सनरायझर्स हैदराबादचा नेट रन रेट प्लस आहे, पण पंजाब किंग्जचा नेट रन रेट खराब आहे, त्यामुळे पंजाब किंग्स विजयासह त्यांचा नेट रनरेट सुधारण्याचे आव्हान असणार आहे. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला, पण कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्याचवेळी पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सचा पराभव केला, पण शिखर धवनचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध पराभूत झाला.
संबंधित बातम्या:
ट्रॅव्हिस हेडची पत्नीची पुन्हा एकदा रंगली चर्चा; सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ, पाहा Photo