(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PBKS Vs RR, IPL 2022 LIVE Updates: राजस्थानचा पंजाबवर 6 विकेट्सनं विजय
PBKS Vs RR, IPL 2022 LIVE Updates: पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स (Punjab Kings Vs Rajasthan Royals) यांच्यात आज आयपीएल 2022 चा 52 वा सामना खेळला जाणार आहे.
LIVE
Background
PBKS Vs RR, IPL 2022 LIVE Updates: पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स (Punjab Kings Vs Rajasthan Royals) यांच्यात आज आयपीएल 2022 चा 52 वा सामना खेळला जाणार आहे. मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) हा सामना रंगणार आहे. यंदाच्या हंगामात पंजाबच्या संघानं आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी सहा सामने जिंकले आहेत. तर, चार सामन्यात पराभव स्वीकारला आहे. दुसरीकडं पंजाबच्या संघानं दहा सामन्यांपैकी पाच सामन्यात विजय आणि पाच सामन्यात पराभव पत्कारला आहे. आजच्या सामन्यात पंजाबच्या संघाला पराभूत करून राजस्थानचं प्लेऑफच्या शर्यतीतील अंतर कमी करण्याचा प्रयत्न असेल.
पंजाब विरुद्ध राजस्थान हेड टू हेड रेकॉर्ड
पंजाब आणि राजस्थान आतापर्यंत 23 वेळा आमने सामने आले आहेत. यापैकी राजस्थान रॉयल्सनं 13 सामने जिंकले आहेत. तर, पंजाबच्या संघानं दहा सामन्यात विजय मिळवला आहे.राजस्थाननं प्रथम फलंदाजी करताना 7 सामने जिंकले आहेत. तर लक्ष्याचा पाठलाग करताना सहा सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, पंजाबनं प्रथम फलंदाजी करताना 7 सामने आणि लक्ष्याचा पाठलाग करताना तीन सामने जिंकले आहेत.पंजाबविरुद्ध राजस्थानचा सर्वाधिक धावसंख्या 223 इतकी आहे. तर, 124 ही सर्वात कमी धावसंख्या आहे. पंजाबच्या संघानं राजस्थानसमोर सर्वाधिक धावसंख्या केली होती. तर, एकदा 112 धावांवर ऑलआऊट झाले.
कधी कुठे रंगणार सामना?
आज 16 एप्रिल रोजी होणारा हा पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 3 वाजता नाणेफेक होईल. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम खेळवला जाणार आहे. पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.
पंजाब विरुद्ध राजस्थान संभाव्य संघ-
पंजाब किंग्स: मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, संदीप शर्मा, अर्शदीप सिंह.
राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, देवदत्त पडिक्कल/यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकीपर), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, करुण नायर, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट , प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन.
हे देखील वाचा-
- MI vs GT: गुजरातला 6 चेंडूत 9 धावांची गरज, अखेरच्या षटकात मुंबईच्या डॅनियल सॅम्सनं कसा पलटवला सामना?
- PKBS Vs RR Probable XI: राजस्थानच्या संघाला आज पंजाब देणार टक्कर, कशी असेल दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
- PKBS Vs RR Head to Head: आज पंजाब आणि राजस्थानमध्ये रंगणार सामना, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड
PBKS Vs RR: राजस्थानचा पंजाबवर 6 विकेट्सनं विजय
मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 52 व्या सामन्यात राजस्थानच्या संघानं पंजाबला पराभूत केलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, पंजाबच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून राजस्थानसमोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. प्रत्युत्तरात राजस्थानच्या संघानं 6 विकेट्स राखून पंजाबला पराभूत केलं. राजस्थानकडून यशस्वी जैस्वालनं 68 धावांची वादळी खेळी केली.
PBKS Vs RR: राजस्थानला चौथा धक्का, देवदत्त पडिक्कल परतला माघारी
देवदत्त पडिक्कलच्या रुपात राजस्थानच्या संघाला चौथा धक्का बसलाय. राजस्थानला अखेरच्या षटकात विजयासाठी 8 धावांची गरज आहे.
PBKS Vs RR: संजू सॅमसन आऊट, राजस्थाननं दुसरी विकेटस् गमावली
पंजाबविरुद्ध सामन्यात राजस्थानच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. कर्णधार संजू सॅमसनच्या रुपात राजस्थानच्या संघाला दुसरा धक्का लागला आहे. त्यानं 12 चेंडूत 23 धावा केल्या.
PBKS Vs RR: राजस्थानच्या संघाला पहिला धक्का, जोस बटलर आऊट
पंजाबनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या संघाला जोस बटरलच्या रुपात पहिला धक्का बसला आहे. त्यानं 16 चेंडूत 30 धावा केल्या आहेत.
PBKS Vs RR: राजस्थानच्या संघाची दमदार सुरुवात, यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर फटकेबाजी सुरू
पंजाबच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाची चांगली सुरुवात झाली आहे. राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर फटकेबाजी करताना दिसत आहेत.