MI vs PBKS Qualifier 2 : रोहितने पूल शॉट हाणला खरा, पण अय्यरच्या मास्टर प्लॅनमध्ये अलगद फसला; पंजाबच्या बॉलरचे आगळे वेगळे सेलिब्रेशन
आयपीएल 2025 च्या हाय-व्होल्टेज क्वालिफायर 2 सामन्यात 5 वेळची चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स पंजाब किंग्जचा सामना करत आहे.

Mumbai Indians vs Punjab Kings Qualifier 2 Match : आयपीएल 2025 च्या हाय-व्होल्टेज क्वालिफायर 2 सामन्यात 5 वेळची चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स पंजाब किंग्जचा सामना करत आहे. या सामन्यात पावसामुळे बराच वेळ सामना थांबला होता, पण नंतर सामना सुरू झाल्यावर मुंबई इंडियन्स संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. पण या सामन्याच्या तिसऱ्या षटकात मुंबई संघाला मोठा धक्का बसला. कारण रोहित शर्मा आऊट झाला.
मार्कस स्टोइनिस मुंबईच्या डावातील तिसरा षटक टाकण्यासाठी आला. स्टोइनिसने या षटकातील दुसरा चेंडू रोहितला शॉर्ट टाकला. रोहित अनेकदा त्यावर पुल शॉट मारतो आणि यावेळी पण त्याने तो खेळला. पण रोहितचा शॉट नीट टाईम नाही झाला आणि विजय कुमारने त्याचा झेल सहज पकडला. यासोबतच, 7 चेंडूत 8 धावा काढून रोहितचा डाव संपला.
अय्यरच्या मास्टर प्लॅनमध्ये फसला हिटमॅन!
एलिमिनेटर सामन्यात शानदार खेळी केल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात रोहित शर्माकडून मोठी खेळी अपेक्षित होती. पण, रोहित 7 चेंडूंचा सामना केल्यानंतर फक्त 8 धावा काढत बाद झाला. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने हिटमॅनला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याची मास्टर प्लॅन बनला होता. कारण, पॉवरप्लेमध्येच अय्यरने बॉल मार्कस स्टोइनिसला दिला. रोहितला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याची अय्यरची युक्ती कामी आली. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्टोइनिसविरुद्ध मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न करताना रोहितने एक सोपा झेल दिला.
Marcus Stoinis abused Rohit Sharma after taking his wicket
— ` (@Was_here4kohli) June 1, 2025
Nobody respects PR merchant Vadapav pic.twitter.com/KTu31WVJms
दुसऱ्या षटकात सुटला होता कॅच...
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मुंबई इंडियन्सच्या डावाच्या दुसऱ्या षटकात रोहित शर्माचा कॅच सुटला होता. काइल जेमिसनच्या चेंडूवर रोहितचा कॅच पॉइंटवर उभ्या असलेल्या अझमतुल्लाह उमरझाईने सोडला. एलिमिनेटर सामन्यातही असेच काहीसे घडले जिथे रोहितने 81 धावांची खेळी केली, परंतु त्याचे 3 कॅच गुजरातच्या खेळाडूंनी सोडले होते.
पंजाबच्या बॉलरचे आगळे वेगळे सेलीब्रेशन
रोहित शर्माची विकेट घेणाऱ्या गोलंदाज मार्कस स्टोइनिसने आगळे वेगळे सेलिब्रेशन केले. रोहितची विकेट घेतल्यानंतर मार्कस स्टोइनिसने छातीत मारत सेलिब्रेशन केले. मात्र, त्यानंतर तिलक वर्माने त्याच षटकात त्याला सलग दोन षटकार मारले. त्यामुळे पंजाब संघाला रोहितच्या विकेटचा कोणताही फायदा झाला नाही.
दोन्ही संघात एक बदल
दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी एक बदल केला आहे. युजवेंद्र चहल पंजाबच्या कॅम्पमध्ये परतला आहे. चहल त्याच्या दुखापतीतून बरा झाला आहे आणि या सामन्यात खेळणार आहे. त्याच वेळी, मुंबईला त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करावा लागला आहे. जखमी ग्लीसनच्या जागी रीस टॉपलीचा अंतिम अकरामध्ये समावेश करण्यात आला आहे.





















