IPL 2023 : मुंबईने अर्शदीपला धुतले तर पंजाबने आर्चरला फोडले, 8 षटकात 122 धावा
PBKS vs MI, IPL 2023 : जोफ्रा आर्चर आणि अर्शदीप सिंह या दोघांनी आयपीएलमधील सर्वात महागडा स्पेल फेकला. दोघांनी आठ षठकात १२२ धावा खर्च केल्या.
PBKS vs MI, IPL 2023 : सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर मुंबईने पंजाबचा सहा विकेटने पराभव केला. पंजाबने दिलेले 215 धावांचे आव्हान मुंबईने सहा विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. पंजाबचा पराभव करत मुंबईने हिशोब चुकता केला. वानखेडेवर पंजाबने मुंबईचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा मुंबईने मोहालीच्या मैदानावर काढला. मुंबई आणि पंजाब या सामन्यात धावांचा पाऊस पाडला. जवळपास ४० षटकांत ४२५ धावांचा पाऊस पाडला. फलंदाजांनी गोलंदाजांचा समाचार घेत धावांचा पाऊस पाडला. पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि मुंबईकडून जोफ्रा आर्चर या आघाडीच्या गोंलदाजांनी सर्वाधिक धावा दिल्या. जोफ्रा आर्चर आणि अर्शदीप सिंह या दोघांनी आयपीएलमधील सर्वात महागडा स्पेल फेकला. दोघांनी आठ षठकात १२२ धावा खर्च केल्या.
अर्शदीपची धुलाई, तिलक वर्माने घेतला बदला -
मोहालीच्या मैदानावर अर्शदीप याने महागडी गोलंदाजी केली. मुंबईच्या गोलंदाजांनी अर्शदीप याच्या गोलंदाजीवर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. अर्शधीप याने जवळपास १८ च्या सरासरीने प्रति षटक धावा खर्च केल्या. अर्शदीपने ३.५ षटकात तब्बल ६६ धावा दिल्या. पंजाबकडून ही सर्वात महागडा स्पेल ठरला. अर्शदीप याने आतापर्यंतची सर्वात निराशाजनक कामगिरी केली.
मुंबईच्या फलंदाजांनी अर्शदीप याचा हिशोबही चुकता केला. अर्शदीप याने मुंबईच्या वानखेड स्टेडिअमवर १६ धावा वाचवताना भेदक मारा केला होता. त्यावेळी अर्शदीप याने तिलक वर्मा याचा त्रिफाळा उडवला होता. या सामन्यात तिलक वर्मा याने अर्शदीपचा समाचार घेतला. तिलक वर्मा याने अर्शदीपच्या गोलंदाजीवर तीन चेंडूत १६ धावा काढल्या. यामध्ये दोन षटकार आणि एक चौकार लगावला.
Arshdeep Singh finishes with 1/66 in 3.5 overs - his most expensive spell in IPL history.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 3, 2023
Comeback strong, Arshdeep! pic.twitter.com/fnSy1bYMoq
Tilak Varma Vs Arshdeep Singh tonight:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 3, 2023
0,0,6,4,6,0,2,6 - 24 runs in 8 balls.
- Fantastic hitting by Tilak against the leading bowler of PBKS. pic.twitter.com/2AItyhwXmd
The match winning 102M six by Tilak Varma against Arshdeep Singh.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 3, 2023
What a talent he is! pic.twitter.com/aFUt7UZm7g
पंजाबने जोफ्रा आर्चरची हवा काढली -
पंजाबने प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या गोलंदाजांची कुटाई केली. प्रत्येक गोलंदाजांचा समाचर घेत २०० धावांचा पल्ला पार केला. पंजाबने विशेषकरुन जोफ्रा आर्चर याचा समाचार घेतला. जोफ्रा आर्चर याने प्रति षटक १४ खर्च केल्या. जोफ्रा आर्चर याने चार षटकात ५६ धावा दिल्या. जोफ्रा आर्चरचा आयपीएलमधील आतापर्यंतचा हा सर्वात महागडा स्पेल आहे.
Jofra Archer has gone for 0/56 in 4 overs.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 3, 2023
Crazy batting by Punjab Kings! pic.twitter.com/hpPhQTWuUE