PBKS vs KKR, IPL 2023 Live : पंजाबचा सात धावांनी विजय
PBKS vs KKR Live Score, IPL 2023: पंजाबचा संघ अनुभवी शिखर धवनच्या नेतृत्वात तर कोलकाताचा संघाची कमान युवा नितीश राणाच्या हाती असेल.
LIVE
Background
IPL 2023, PBKS vs KKR Match Preview : आयपीएल 2023 मधील दुसरा सामना आज पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात रंगणार आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघातील काही खेळाडू दुखापतीमुळे उपलब्ध नाहीत. त्यासोबतच दोन्ही संघ नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
काही परदेशी खेळाडूंच्या उपलब्ध नाहीत, तसेच काही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत, अशातच पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) शनिवारी आयपीएल 2023 च्या आपल्या सलामीच्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. आयपीएलची विजयी सुरुवात करण्याचं दोन्ही संघांचं लक्ष्य असेल. दरम्यान, पंजाब आणि कोलकाता दोन्ही संघांकडे तगडे खेळाडू आहेत, पण मैदानावरील त्यांची कामगिरी फारशी प्रभावी ठरलेली नाही.
IPL 2023, PBKS vs KKR : दोन्ही संघ नव्या कर्णधारासह मैदानात
आजच्या सामन्यासाठी पंजाबचा संघ अनुभवी शिखर धवनच्या नेतृत्वात तर कोलकाताचा संघाची कमान नितीश राणाच्या हाती असेल. दोन्ही संघ नव्या नेतृत्वाखाली जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. पंजाब किंग्सचा आयपीएलच्या एकाही सीझनमध्ये विजय मिळवता आलेला नाही. त्याउलट राजस्थान संघाने याआधी गौतम गंभीरच्या नेतृत्वात दोन वेळा आयपीएलची ट्रॉफी कमावली आहे.
IPL 2023, PBKS vs KKR : कुणाचं पारड जड?
मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या (Punjab Cricket Association Stadium) आयएस बिंद्रा स्टेडियमवर (IS Bindra Stadium) आज दुपारी पंजाब (Punjab) आणि कोलकाला (Kolkata) संघ आमनेसामने असतील. दोन्ही संघांमधील मागील सामन्यांवर नजर टाकली तर हे संघ आळीपाळीने एकमेकांना पराभूत करत आहेत. गेल्या पाच सामन्यांपैकी केकेआरने तीन सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्सने दोन सामने गमावले आहेत. आजच्या सामन्यात पंजाब किंग्सचं पारड काहीसं जड असेल. याचं कारण म्हणजे पंजाब संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे. तक दुसरीकडे, कोलकाता संघ आपला नियमित कर्णधार श्रेयस अय्यरशिवाय मैदानात उतरणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर सध्या संघाबाहेर आहे. श्रेयस यानंतरच्या सामन्यामध्ये परतण्याची शक्यता आहे. सध्या केकेआरची कमान नितीश राणाच्या हाती आहे.
कशी आहे खेळपट्टी?
मोहालीची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जात आहे. येथील मैदान लहान असल्यामुळे येथे जास्त चौकार-षटकार मारले जातात. येथे झालेल्या सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चा वेळा 200 हून अधिक धावसंख्या करण्यात आली होती. या मैदानावर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झाला.
पंजाबचा सात धावांनी विजय
डकवर्थ लुईस नियमांनुसार पंजाबचा सात धावांनी विजय
पंजाब आणि कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय
पंजाब आणि कोलकाता यांच्यातील सामन्यात पावसाचा व्यत्यय आलाय. कोलकाता सात बाद 146 धावा.... शार्दुल ठाकूर आणि नारायण मैदानात
कोलकात्याला सातवा धक्का, अय्यर बाद
अर्शदीप सिंह याने मोक्याच्या क्षणी जम बसलेल्या व्येंकटेश अय्यरला बाद केले.
कोलकात्याला मोठा धक्का, रसेल बाद
मोक्याच्या क्षमी कोलकात्याला मोठा धक्का बसला आहे. रसेल बाद झाला आहे.. कोलकाता 6 बाद 130 धावा
वेंकटेश अय्यर आणि रसेलची फटकेबाजी
वेंकटेश अय्यर आणि रसेलची फटकेबाजी, सामना रोमांचक स्थितीत पोहचला आहे. कोलकात्याला विजयासाठी प्रति षटक 12 धावांची गरज