(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022 Records : आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट कोणाचा? हा परदेशी आहे अव्वल
यंदाच्या इंडियन प्रिमीयर लीगमध्ये बरेच खेळाडू दमदार फलंदाजी करताना दिसत आहेत. यामध्ये दिनेश कार्तिकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
IPL 2022 : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेत एकापेक्षा एक चुरशीचे आणि रोमहर्षक सामने होत आहेत. कधी मोठी धावसंख्या उभी राहत आहे, तर कधी काही संघ स्वस्तात तंबूत परतत आहे. पण या स्पर्धेत काही जुने तर काही नवे खेळाडू तुफान फटकेबाजीने सर्वांचच लक्ष वेधत आहेत. काही खेळाडूंनी तुफान स्ट्राईक रेटने धावा केल्या असून या यादीत कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज पॅट कमिन्स अव्वल स्थानावर आहे.
पॅटने यंदाच्या आय़पीएलमध्ये लगावलेल्या एका तुफान अर्धशतकामुळे सर्वाधिक स्ट्राईक रेटने रन बनवणारा खेळाडू तो बनला आहे. त्याने 262.50 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली आहे. त्याने पाच सामन्यात केवळ 24 चेंडू खेळत 63 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध 14 चेंडूत अर्धशतक लगावलं होतं. पॅटनंतर या यादीत नंबर लागतो तो म्हणजे भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचा. दिनेशने देखील यंदा 200 च्या स्ट्राईक रेटने रन केले आहेत. त्याने 12 सामन्यातील 12 डावात 8 वेळा नाबाद राहत 137 चेंडूत 274 रन बनवले आहेत.
अष्टपैलू खेळाडूची तुफान फटकेबाजी
या यादीतील पुढील तिन्ही नावं अष्टपैलू खेळाडूंची आहेत. गुजरात टायटन्स संघाचा विचार करता त्यांचा ऑलराउंडर राशिद खान या यादीत तिसऱ्या नंबरवर आहे. त्याने सीजनच्या 11 सामनन्यात 38 चेंडूवरवर 72 रन केले आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 189.47 इतका राहिला आहे. या यादीतील चौथं नाव आहे वॉशिंगटन सुंदरचं असून त्याने केवळ 4 डाव खेळत 63 रन बनवले आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 185.29 आहे. या टॉप-5 फलंदाजामध्ये पंजाब किंग्सचा लियाम लिव्हिंगगस्टोन असून त्याने 11 सामन्यात 171 चेंडूत 315 रन केले आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 184.21 इतका राहिला आहे.
हे देखील वाचा-
- Shreyas Iyer : प्रशिक्षक आणि कर्णधारच नाही तर संघाचे CEO देखील टीम सिलेक्शनमध्ये घेतात भाग, श्रेयसच्या विधानाने खळबळ
- VIDEO : छोटी बच्ची हो क्या? शिखर धवन आणि प्रीती झिंटाचा वर्कआउटचा व्हिडीओ पाहिला का?
- SuryaKumar Yadav : 'मी माझा कुटुंब मुंबई इंडियन्ससाठी...' आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर सूर्यकुमार यादव भावूक