MI vs LSG, Toss Update : मुंबईने नाणेफेक जिंकली, सामना जिंकणार का? पहिली गोलंदाजी घेत महत्त्वाचा बदल; पाहा आजची अंतिम 11
IPL : आतापर्यंतच्या आयपीएल 2022 मध्ये एकही सामना न जिंकलेल्या मुंबईला आज पहिला विजय मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. लखनौचं आव्हान समोर असणार असून मुंबई आधी गोलंदाजी करत आहे.

MI vs LSG : आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील आजच्या 26 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स (MI vs LSG) यांच्यात पार पडत आहे. सामन्यात नुकतीच नाणेफेक झाली असून मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लखनौ आधी फलंदाजी करणार आहे. स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना न जिंकलेल्या मुंबईने आज नाणेफेक जिंकल्याने त्यांच्यासाठी सामना जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. स्पर्धेतील आजचा हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर पार पडणार आहे.
यंदाच्या हंगामात मुंबईने पाच पैकी पाच सामने गमावले आहेत. त्यामुळे त्यांना दुसरीकडे लखनौ मात्र कमाल फॉर्ममध्ये असून त्यांनी पाच पैकी तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज मुंबई विजयाचं खातं उघडणार की लखनौ त्यांना मात देणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुंबईने बेसिल थम्पी ऐवजी फेबियन एलनला संघात घेतलं आहे. तर लखनौने के. गौथमच्या जागी मनिष पांडेला संधी दिली आहे. तर नेमके अंतिम 11 खेळाडू कोण आहेत ते पाहूया...
मुंबई अंतिम 11
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, डी. ब्रेविस, फेबियन अॅलन, मुरुगन आश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, जयदेव उनाडकट
लखनौ अंतिम 11
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, मनिष पांडे, दुष्मंता चमिरा, रवी बिश्नोई, आवेश खान.
हे देखील वाचा-




















