MI vs RR: मुंबई इंडियन्स आज विजयाचं खातं उघडणार?; राजस्थानही सज्ज, पाहा दोघांची संभाव्य Playing XI
Mumbai Indians vs Rajasthan Royals Probable XI: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ या हंगामातील पहिला विजय मिळवण्यासाठी खेळेल.
Mumbai Indians vs Rajasthan Royals Probable XI: आयपीएल 2024 च्या हंगामात आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सामना होणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा रंगतदार सामना होईल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता मुंबई आणि राजस्थानचा सामना सुरु होईल.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ या हंगामातील पहिला विजय मिळवण्यासाठी खेळेल. मुंबईने दोन सामने खेळले असून दोनही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेच विजयासह मुंबईला नेट रनरेट देखील सुधारण्याची आवश्यकता आहे. तर राजस्थान सलग तिसऱ्या विजयासाठी उत्सुक असेल. राजस्थानने आतापर्यंत दोन सामने खेळले असून दोनही सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे.
33,000 people shouting "𝘽𝙊𝙊𝙈 𝘽𝙊𝙊𝙈 𝘽𝙐𝙈𝙍𝘼𝙃" on Monday night. 🔥
— Mumbai Indians (@mipaltan) March 31, 2024
Cannot. Wait. ⌛💙#MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/NhJjZYR1g2
वानखेडेची खेळपट्टी कशी असेल?
आयपीएल 2024 मधील 14 वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. वानखेडेवर फलंदाजीसाठी पोषक अशी खेळपट्टी असते. या मैदानावर धावांवर नियंत्रण ठेवणे गोलंदाजांसाठी खूप अवघड काम असते. वेगवान आउटफिल्डमुळे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवणे सोपे फलंदाजांसाठी राहते.
आकडे काय सांगतात?
वानखेडे मैदानावर आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 109 सामने खेळले गेले आहेत. यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 50 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर 59 सामन्यांमध्ये पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. म्हणजेच धावांचा पाठलाग करणे हा या मैदानावर फायदेशीर असल्याचे दिसते.
मुंबई इंडियन्सची Probable XI:
रोहित शर्मा, इशान किशन (यष्टिरक्षक), नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका.
राजस्थान रॉयल्सची Probable XI:
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहल.
मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ:
रोहित शर्मा, इशान किशन (W), नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका, मोहम्मद नबी, सूर्यकुमार यादव, श्रेयस गोपाल, ल्यूक वुड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, नुवान तुषारा, डेवाल्ड ब्रेविस
राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ:
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (W/C), रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान, नांद्रे बर्गर, नवदीप सैनी, केशव महाराज , टॉम कोहलर-कॅडमोर, रोव्हमन पॉवेल, तनुष कोटियन, कुलदीप सेन, डोनोवन फरेरा, आबिद मुश्ताक, शुभम दुबे, कुणाल सिंग राठौर
संबंधित बातम्या:
आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, पाहा Photos