Mumbai Indians: मुंबईचा संघ पुढच्या वर्षी सहावी ट्रॉफी जिंकणार; रोहित शर्मा, सुर्यकुमार यादवचा विश्वास
Mumbai Indians: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे.
Mumbai Indians: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाला 14 पैकी केवळ चार सामन्यात विजय मिळवता आला. तर, दहा सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकणारा संघ यंदाच्या हंगामात खूप संघर्ष करताना दिसला. परंतु, आयपीएलच्या पुढच्या हंगामात मुंबईचा संघ त्यांची सहावी ट्रॉफी जिंकेल, असा विश्वास संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईच्या संघानं नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ज्यात रोहित शर्मा मुंबईच्या संघानं जिंकलेल्या पाच ट्रॉफीसोबत उभा असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओत रोहित म्हणतोय की, हा मुंबई इंडियन्सचा संघ आहे आणि पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच धमाकेदार पुनरागमन करू. तर, सुर्यकुमार यादव बोलतोय. आम्हाला आयपीएलची सहावी ट्रॉफी जिंकायची आहे. या वर्षी आम्हाला तसं करता आलं नाही. परंतु, 2023 मध्ये आम्ही आयपीएलची सहावी नक्कीच उचलणार.
व्हिडिओ-
मुंबईच्या संघाला मागील दोन हंगामापासून काही खास कामगिरी करता आली नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाला मागील दोन्ही हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलं नाही. रोहित शर्मा आणि इशान किशन फॉर्ममध्ये नसताना जसप्रीत बुमराहला गोलंदाजीत अन्य दुसऱ्या गोलदाजांची साथ मिळाली नाही. सूर्यकुमार यादव दुखापतीमुळं सलामीच्या सामन्यात खेळू शकला नाही आणि संघाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू कायरन पोलार्ड साठीही यंदाचा हंगाम फ्लॉफ ठरला.
हे देखील वाचा-