Rohit Sharma : ये हिरो, काय करतोय...रोहित शर्मानं घेतली तिलक वर्माची फिरकी, मुंबई इंडियन्सकडून व्हिडीओ शेअर
Rohit Sharma : आयपीएलमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स आमने सामने येणार आहेत. मुंबईचा संघ ईडन गार्डन्सवर दाखल झालाय.
कोलकाता : आयपीएलमध्ये (IPL 2024) आज कोलकाता येथे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आमने सामने येणार आहेत. ही आयपीएलमधील 60 वी मॅच आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर ही मॅच होणार असून मुंबई इंडियन्सचा संघ या मैदानावर दाखल झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा यंदाच्या हंगामातील होम ग्राऊंडवरील अखेरचा सामना आज आहे. मुंबई इंडियन्स जरी आयपीएल बाहेर गेलं असलं तरी राहिलेल्या मॅचमध्ये विजय मिळवत शेवट गोड करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. या दरम्यान मुंबई इंडियन्सनं सोशल मीडियावरुन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि तिलक वर्माचा (Tilak Varma) मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. रोहित शर्मा त्यात तिलक वर्माची फिरकी घेताना दिसतो.
रोहित शर्माची तिलक वर्माला गुगली
मुंबई इंडियन्सनं रोहित शर्मा आणि तिलक वर्माचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात तिलक वर्मा मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचं दिसून येतं. मागून आलेल्या रोहित शर्मानं त्याला ये हिरो अशी हाक मारल्याचं दिसतं. यानंतर रोहित शर्मा तिलक वर्माला म्हणतो चप्पल घालून आला आहेस काही गार्डनमध्ये आलाय का? यावर तिलक वर्मानं त्याला उत्तर दिलं की हो ना भैय्या ईडन गार्डन्स , यावर रोहित शर्मा गमतीनं आश्चर्यचकीत होत, काय ईडन गार्डन्स असं म्हणतो. मुंबईनं शेअर केलेल्या या व्हिडीओला मुंबईचे चाहते आणि नेटकरी पसंत करत आहेत.
पाहा व्हिडीओ
Rohit 🤝 Garden
— Mumbai Indians (@mipaltan) May 10, 2024
An iconic love story 😂💙#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #KKRvMI | @ImRo45 | @TilakV9 pic.twitter.com/KX2ttJAS5h
कोलकाताला प्लेऑफचं तिकीट की मुंबई विजय मिळवणार?
कोलकाता नाईट रायडर्सकडे जवळपास तीन वर्षानंतर प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. गौतम गंभीर मेंटर म्हणून कोलकाता नाईट रायडर्ससोबत काम करु लागल्यानंतर संघाची कामगिरी सुधारली आहे. कोलकातानं 11 पैकी 8 मॅचमध्ये विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कबब्जा केला आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी केकेआरला केवळ एका विजयाची गरज आहे. कोलकाता आजचं प्लेऑफचं तिकीट निश्चित करण्याच्या प्रयत्नात असेल.
दुसरीकडे पाचवेळा आयपीएलचं विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. मुंबई इंडियन्स गुणतालिकेत नवव्या स्थानावर असून प्लेऑफच्या शर्यतीतून पहिला बाहेर पडणारा संघतोच आहे. मुंबई इंडियन्सचा संघ राहिलेल्या मॅचमध्ये विजय मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल.
फिल सॉल्ट आणि सुनील नरेन या दोघांना सलामीला पाठवण्याचा निर्णय केकेआरसाठी गेमचेंजर ठरला आहे. तर, मुंबईचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव देखील फॉर्ममध्ये परतलाय.
संबंधित बातम्या :
MS Dhoni : धोनीचे सलग दोन षटकार, चाहत्यानं आयपीएलची सुरक्षा भेदली, माहीच्या पाया पडला अन् मिठी मारली