Suryakumar Yadav: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात टेंन्शन वाढवणारी बातमी; सुर्यकुमार यादवच्या पुनरागमनाची आली अपडेट!
Mumbai Indians Suryakumar Yadav: सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्ससाठी आणखी एक वाईट बातमी आली आहे.
Mumbai Indians Suryakumar Yadav: सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्ससाठी आणखी एक वाईट बातमी आली आहे. संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. अशा स्थितीत तो आणखी सामने खेळू शकणार नाही. या बातमीमुळे कर्णधार हार्दिक पांड्याचं टेन्शन वाढणार हे नक्की, कारण आतापर्यंत मुंबईला या मोसमात विजयाचं खातेही उघडता आलेलं नाही. आयपीएल 2024 च्या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सूर्यकुमार यादव स्पोर्ट्स हर्नियाच्या शस्त्रक्रियेतून पूर्णपणे बरा झालेला नाही आणि आयपीएलचे आणखी काही सामने खेळू शकणार नाही. मात्र, राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) त्याच्या रिकव्हरीवर लक्ष ठेवून आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सूर्यकुमारला आयपीएलच्या चालू हंगामात आतापर्यंत एकही सामना खेळता आलेला नाही आणि त्याच्या संघाला दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (बीसीसीआय) सूत्राने सांगितले की, सूर्यकुमार यादवची प्रकृती हळूहळू सुधारत आहे आणि लवकरच मुंबई इंडियन्ससाठी पुनरागमन करेल.
Suryakumar Yadav might miss a few more games to get match fit for Mumbai Indians. [PTI] pic.twitter.com/fxoanyhErJ
— Johns. (@CricCrazyJohns) March 28, 2024
मुंबई इंडियन्सला सूर्यकुमारची उणीव भासत आहे, परंतु बीसीसीआय या आक्रमक फलंदाजाच्या तंदुरुस्तीबाबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही, कारण जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत तो मोठी भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी T20 विश्वचषक 2024 च्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) सूर्याच्या फिटनेसमध्ये कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. सूर्याला विश्वचषकात भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावताना पाहता येईल. टी-20 फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत.
सूर्यकुमार यादवची कारकीर्द-
2012 मध्ये मुंबईकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या सूर्याने आतापर्यंत 139 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 143.32 च्या स्ट्राईक रेटने 3249 धावा केल्या आहेत. 33 वर्षीय फलंदाजाच्या नावावर आयपीएलमध्ये एक शतक आणि 21 अर्धशतके आहेत. मुंबईसाठी वेगवान धावा करण्यात तो माहीर आहे. त्याचबरोबर या खेळाडूने भारतासाठी 60 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2141 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर चार शतके आणि 17 अर्धशतके आहेत.
मुंबई इंडियन्समध्ये फुट पडल्याची चर्चा-
मुंबईच्या संघातून एक मोठी माहिती समोर येत आहे. मुंबईच्या संघात दोन गट पडल्याचे सांगण्यात येत आहे. एक गटात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा आणि इतर खेळाडूंचा समावेश असून दुसऱ्या गटात हार्दिक पांड्या आणि इशान किशन आणि इतर खेळाडूंचा समावेश असल्याची चर्चा रंगली आहे. अद्याप अधिकृत कोणतीही माहिती समोर आली नसली तर मुंबई इंडियन्सच्या संघात दोन गट पडल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
संबंधित बातम्या:
Kavya Maran: हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video