IPL 2023 : मुंबई मेरी जान! इंडियन्स वानखेडेवर अजिंक्यच, सलग 10 वर्ष कोलकातावर मात
IPL 2023, MI on Wankhede : आयपीएलमध्ये 2013 पासून कोलकाता नाईट रायडर्स संघाला मुंबईकडून सलग आठ वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
IPL 2023, MI Won vs KKR on Wankhede : आयपीएलच्या 16 व्या हंगामात वानखडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) पार पडलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा पराभव केला. रविवारी (16 एप्रिल) पार पडलेल्या सामन्यात केकेआरला मुंबईकडून पाच विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. मुंबई इंडियन्सने कोलकाचा विरोधात नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताने पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईसमोर 186 धावांचं लक्ष्य ठेवलं. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने शेवटच्या षटकातील चार चेडूं शिल्लक असताना सामना खिशात घातला.
IPL 2023, MI on Wankhede : मुंबई इंडियन्स वानखेडेवर अजिंक्यच
या सामन्यात विजयासह मुंबईने कोलकाता विरोधात वानखेडेवरील विजयाची परंपरा कायम ठेवली आहे. गेल्या दहा वर्षात कोलकाता नाईट रायडर्स संघाला मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडिअमवर एकही सामना जिंकता आलेला नाही. वानखेडे स्टेडिअमवर कोलकाताविरुद्धच्या सामन्यात 2013 पासून मुंबई इंडियन्स अजिंक्य आहे. आयपीएल 2013 पासून केकेआरला मुंबईकडून मिळालेला हा सलग आठवा पराभव आहे.
IPL 2023, MI on Wankhede : कोलकाता विरोधात वानखेडेवरील विजयाची परंपरा कायम
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (MI vs KKR) या दोन्ही संघ आयपीएल 2013 (IPL 2013) पासून आठ वेळा वानखेडेच्या याच मैदानावर आमने सामने आले आहेत. विशेष म्हणजे गेल्या 10 वर्षात खेळलेल्या आठही सामन्यांमध्ये मुंबईने वर्चस्व राखलं आणि विजय मिळवला आहे. 2013 पासून कोलकाता वानखेडे स्टेडिअमवर एकही सामना जिंकता आला नाही.
मुंबई आणि कोलकाता यांच्यातील आयपीएलच्या आकडेवारीनुसार, आयपीएलमध्ये मुंबई आणि कोलकाता या दोन्ही संघात एकूण 32 सामने झाले आहेत. मुंबई इंडियन्सने 31 पैकी 22 सामने जिंकले आहेत. तर, केकेआर संघाला फक्त 9 सामने जिंकता आले आहेत.
IPL 2023, MI on Wankhede : मुंबईची 2 वर्षानंतर वानखेडे स्टेडिअमवर घरवापसी
आयपीएल 2023 मध्ये वानखेडे स्टेडिअमवर दोन वर्षानंतर परतली आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्ष मुंबई इंडियन्स संघाला वानखेडे स्टेडिअमवर खेळता आलं नव्हतं. पण, यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली असनू त्यांना मुंबईच्या खेळाडूंना घरच्या मैदानावर खेळताना पाहायला मिळतंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :