Mumbai Indians: मुंबईची ताकद वाढणार, बंगळुरु विरुद्ध भिडण्याअगोदर वर्ल्ड कप विजेता खेळाडू ताफ्यात, हार्दिक पांड्याचं टेन्शन मिटणार
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचं आगमन झालं आहे. हार्विक देसाईला संघात संधी दिल्याची माहिती मुंबईकडून देण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) यांच्यात आयपीएलमधील 25 वी मॅच होणार आहे. आजच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्स विजय मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. मुंबई इंडियन्सचा खेळाडू विष्णू विनोद (Vishnu Vinod) जखमी झाल्यानं स्पर्धेबाहेर गेला आहे. विष्णूच्या जागी मुंबई इंडियन्समध्ये हार्विक देसाईची (Harvik Desai) एंट्री झालेली आहे. मुंबई इंडियन्सनं याबाबत माहती दिली आहे.
मुंबई इंडियन्सला आतापर्यंत पहिल्या चार पैकी तीन मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. तर, मुंबईला दिल्ली कॅपिटल्स विरोधात एकमेव विजय मिळाला आहे. आज मुंबई आणि आरसीबी यांच्यात मॅच होणार आहे. या मॅचपूर्वी मुंबईनं एक मोठी अपडेट दिली आहे.
मुंबई इंडियन्समध्ये विष्णू विनोदच्या जागी हार्विक देसाईची एंट्री झाल्याची माहिती दिली आहे. हार्विक देसाई हा सौराष्ट्रचा खेळाडू आहे. हार्विक हा विकेटकीपर आहे. विशेष बाब म्हणजे त्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत 175 च्या स्ट्राइक रेटनं 336 धावा केल्या आहेत. हार्विक देसाईनं 2018 च्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
आरसीबी की मुंबई विजयाची गुढी कोण उभारणार?
यंदाच्या आयपीएलमध्ये पाचवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सी सुरुवात चांगली झालेली नाही. मुंबईला चार पैकी तीन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबईला पहिला विजय मिळाला. आता मुंबई इंडियन्स विजयाचा ट्रेंड कायम ठेवण्याच्या इराद्यानं आज मैदानात उतरले. दुसरीकडे आरसीबी देखील सुरुवातीच्या पाच मॅचमध्ये चांगली कामगिरी करु शकलेली नाही. आरसीबीनं पहिल्या पाच पैकी चार मॅचमध्ये पराभव स्वीकारला आहे. आजच्या मॅचमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात विजयाची गुढी उभारण्याचा मुंबई इंडियन्सचा प्रयत्न असेल. दुसरीकडे आरसीबी देखील विजय मिळवण्यासाठी उत्सुक असेल.
मुंबई आणि आरसीबी दुसऱ्या विजयासाठी भिडणार
मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केलंय. दुसरीकडे आरसीबीनं देखील एकमेव विजय मिळवला असून त्यांनी पंजाब किंग्जला पराभूत केलं आहे. आज दोन्ही संघ विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरतील. विशेष बाब म्हणजे मुंबईचा प्रमुख फलंदाज असलेला रोहित शर्माला गेल्या मॅचमध्ये सूर गवसलेला आहे. दुसरीकडे आरसीबीचा प्रमुख फलंदाज असलेल्या विराट कोहली देखील फॉर्ममध्ये आहे. जयपूरमध्ये झालेल्या मॅचमध्ये विराट कोहलीनं शतक झळकवलं होतं. विराट कोहली फॉर्ममध्ये असला तरी त्यांचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल मोठी खेळी करु शकलेला नाही.
संबंधित बातम्या :
आरसीबीचा पराभव करणं सोप्पं नाही, हेड टू हेड आकड्यात मुंबईचं पारडं जड, पण...
विराट-रोहित नव्हे याला बनवा कर्णधार, मालमाल व्हाल, पाहा MI vs RCB ड्रीम टीम!