MS Dhoni With World Cup Trophy: फोटो नव्हे तर हा भावनिक क्षण! धोनीने 2011च्या विश्वचषक ट्रॉफीला स्पर्श करताच भारतीय आठवणीत रमले
MS Dhoni With World Cup Trophy: धोनी हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार तर आहेच, पण जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्येही त्याचे नाव सामील आहे.
MS Dhoni With World Cup Trophy: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. पहिला टी-20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि नंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी. धोनी हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार तर आहेच, पण जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्येही त्याचे नाव सामील आहे.
धोनी सध्या आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळत आहे. मुंबईविरुद्धच्या पुढील सामन्यापूर्वी धोनी वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत दिसला होता. बीसीसीआयने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना 2011 मधला तो क्षण आठवला जेव्हा भारताने 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकला होता. तसेच अनेक धोनीचा हा फोटो पाहून अनेक जण भावूक झाल्याचे देखील सांगत आहे. आज मुंबईतील वानखेडे मैदानावर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. यादरम्यान बीसीसीआयने मैदानाच्या परिसरात भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत जिंकलेल्या आयसीसी ट्रॉफी ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी धोनीने जवळ जाऊन ट्रॉफीला हात लावल्याचे दिसून आले.
बीसीसीआयचं ट्विट-
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) धोनीचे विश्वचषक ट्रॉफीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर करताना, बीसीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिले, 'MS Dhoni-World Cup Trophy, Made for each other.' या फोटोंमध्ये धोनी वर्ल्ड कप ट्रॉफीला हात लावताना दिसत आहे. हे फोटो पाहून चाहत्यांना 2011 च्या विश्वचषकातील विजयाचा क्षण आठवला, जेव्हा धोनीने षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला होता.
MS Dhoni 🤝 World Cup Trophy
— BCCI (@BCCI) April 13, 2024
Made for each other❤️
📌 BCCI HQ | @msdhoni | #TeamIndia pic.twitter.com/4Bak4bG7pA
सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर
सोशल मीडियावर चाहत्यांकडून कमेंट्सचा पूर आला आहे. एका यूजरने लिहिले की, 'असे वाटते की जणू कालच घडले आहे.' आणखी एका युजरने लिहिले की, 'सर्वकालीन महान कर्णधार.' दुसऱ्या युजरवर टिप्पणी करताना लिहिले की, 'म्हणूनच एमएस धोनीला महान म्हटले जाते. ज्या व्यक्तीने भारतीय क्रिकेट संघाला आपल्या कर्णधारपदाच्या काळात सुवर्णकाळ अनुभवला. दुसऱ्या युजरने लिहिले, 'या क्षणासाठी खूप खूप धन्यवाद थाला! हे फक्त तुच करू शकतो.
भारतीय संघाने 2011 चा विश्वचषक जिंकला होता
2011 मध्ये भारतात झालेला एकदिवसीय विश्वचषक देशवासीयांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नव्हता. भारतीय क्रिकेट संघाने तब्बल 28 वर्षांनंतर विश्वचषक ट्रॉफी आपल्या नावावर केली. विजयी षटकार धोनीच्या बॅटमधून आला आणि दिग्गज रवी शास्त्री यांची ती कॉमेंट्री कोण विसरू शकेल. हा विश्वचषक जिंकणे अनेक अर्थांनी खास होते. त्यानंतर भारताला अद्याप विश्वचषक जिंकता आलेला नाही.
संबंधित बातम्या:
IPL 2024: नाव मोठं, लक्षण खोटं, महागड्या खेळाडूंनी वाट लावली, 17 कोटीच्या खेळाडूने तर लाज काढली!
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसारखी दिसणारी ही मिस्ट्री गर्ल कोण?; पाहा Photo's