MS Dhoni News : 'आता शरीर साथ...', एमएस धोनी आज आयपीएलमधून निवृती घेणार? गुजरातविरुद्ध टॉस जिंकल्यानंतर काय म्हणाला?
MS Dhoni Statement On Retirement : चेन्नई सुपर किंग्ज इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध त्यांचा शेवटचा लीग सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला.

MS Dhoni Retirement News : चेन्नई सुपर किंग्ज इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध त्यांचा शेवटचा लीग सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 43 वर्षीय धोनीबद्दल असे म्हटले जात होते की, हा त्याचा आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना आहे, परंतु नाणेफेकीनंतर जेव्हा त्याला याबद्दल विचारण्यात आले. तेव्हा त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेणार असल्याचे कोणतेही संकेत दिले नाहीत.
टॉसनंतर जेव्हा रवी शास्त्रींनी थाला त्याच्या आयपीएल भविष्याबद्दल विचारले तेव्हा धोनी म्हणाला, शरीराने अजूनही साथ दिली आहे. प्रत्येक वर्ष हे नवीन आव्हान असते. त्यामुळे मला शरीराची खूप काळजी घ्यावी लागते. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना मला पुरेशा अडचणी आल्या नाहीत.
पुढे धोनी म्हणाला की, चेन्नईच्या वातावरणात बदल झाला, असून तेथील उष्णता आणि अहमदाबादमधील उष्णता यात फरक आहे. चेन्नईमधील वातावरण 3.30-४ नंतर आता चांगले असते. पण प्रत्येक खेळाडूला उष्णतेचा त्रास फार होत नाही. आता आम्ही टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहोत, जिंकलो किंवा हरलो तरी आम्ही शेवटच्या क्रमांकावर असणार आहे. त्यामुळे क्रिकेटचा आनंद घेण्याची गरज आहे. या सामन्यात एक बदल केला आहे अश्विन बाहेर गेला आहे आणि हुड्डा परतला आहे.
🚨 Toss 🚨@ChennaiIPL won the toss and elected to bat against @gujarat_titans in Match 6⃣7⃣
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2025
Updates ▶️ https://t.co/P6Px72jm7j#TATAIPL | #GTvCSK pic.twitter.com/gta9Owq3OT
चेन्नई सुपर किंग्ज संघांची प्लेइंग-11 : आयुष म्हात्रे, डेव्हॉन कॉनवे, उर्विल पटेल, रवींद्र जडेजा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, दीपक हुडा, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), नूर अहमद, अंशुल कंबोज, खलील अहमद.
इम्पॅक्ट प्लेयर : मथिशा पाथिराना, विजय शंकर, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, रविचंद्रन अश्विन.
गुजरात टायटन्स संघांची प्लेइंग-11 : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, जेराल्ड कोएत्जे, आर साई किशोर, मोहम्मद सिराज, अर्शद खान, प्रसिद्ध कृष्णा.
इम्पॅक्ट प्लेयर : साई सुदर्शन, अनुज रावत, महिपाल लोमरोर, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा.
हे ही वाचा -





















