एक्स्प्लोर

IPL 2023 : धोनीचा चिमुकलीसोबत खास संवाद, हैदराबादचा गोलंदाज नटराजनच्या मुलीसोबतचा Cute व्हिडीओ व्हायरल

MS Dhoni Viral Video : धोनीने सनरायझर्स हैदराबाद (SRH) वेगवान गोलंदाज थंगारासू नटराजनच्या मुलीसोबत संवाद साधला. दोघांच्या भेटी दरम्यानचा क्यूट व्हिडीओ समोर आला आहे.

MS Dhoni Interaction with SRH Natarajan's Daughter : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघावर सात विकेट्सने विजय मिळवला. कर्णधार धोनीच्या चेहऱ्यावर चेन्नई संघाच्या विजयानंतरचा आनंद स्पष्ट दिसत होता. या सामन्यानंतर धोनीने चेन्नई संघासोबत हैदराबाद संघाच्या खेळाडूंचीही भेट घेत, त्यांच्यासोबत संवाद साधला. हैदराबाद संघातील तरुण खेळाडूंना धोनीनं प्रोत्साहन दिलं. याशिवाय धोनीनं एका चिमुकलीसोबतही खास संवाद साधला. याचा क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चेन्नई सुपर किंग्स (CSK) कर्णधार महेंद्र सिंह धोनीने शुक्रवारी, 21 एप्रिलला सामना संपल्यानंतर हैदराबाद संघातील खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. धोनीने सनरायझर्स हैदराबाद (SRH) वेगवान गोलंदाज थंगारासू नटराजन यांच्या मुलीसोबत संवाद साधला. दोघांच्या भेटी दरम्यानचा खास व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये धोनी नटराजनच्या मुलीसोबत मजेशीर संवाद साधताना आणि खेळताना दिसत आहे. 

पाहा Video : नटराजनच्या मुलीसोबत संवाद, व्हिडीओ व्हायरल

चेन्नईच्या घरच्या मैदानावर म्हणजे एमए चिदंबरम स्टेडियमवर (Chepauk Stadium) पार पडलेल्या सामन्यात चेन्नईने सात गडी राखून दमदार विजय मिळवला. हैदराबादच्या संघाने नाणेफेक गमावल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी केली आणि 20 षटकात सात गडी बाद 134 धावा केल्या. चेन्नईच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांची नाच्चकी केली आणि शानदार विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यासाठी नटराजनला सनरायझर्स हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नव्हती. पण सामना संपल्यानंतर नटराजनने धोनीची भेट घेतली. यावेळी नटराजनची पत्नी आणि मुलगीही त्याच्यासोबत होती. धोनीनं नटराजनच्या मुलीसोबत गोड संवाद साधला. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

चेन्नईचा हैदराबादवर सात विकेटने विजय

रविंद्र जाडेजाचा भेदक मारा आणि डेवॉन कॉनवेच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने हैदराबदचा सात विकेटने पराभव केला. हैदराबादने दिलेले 135 धावांचे आव्हान चेन्नईने सात विकेट आणि आठ चेंडू राखून पार केले. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने 18.4 षटकांत 3 विकेट्स राखून हा सामना जिंकला. चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाचा हिरो सलामीवीर डेवॉन कॉनवे ठरला. चेन्नईकडून डेवॉन कॉनवे याने नाबाद 77 धावांची खेळी केली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IPL 2023 : धोनीची क्रिकेटमधून निवृत्ती? चेपॉकमध्ये 'कॅप्टन कुल'चा मोठा खुलासा, म्हणाला...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
Embed widget