(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 : 'हा माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा', हैदराबादवरील विजयानंतर धोनी भावुक; पाहा Video
IPL 2023 : धोनीनं (MS Dhoni) चेन्नई (CSK) संघाबद्दलचं प्रेम पुन्हा एकदा व्यक्त केलं आहे. तसेच धोनी आयपीएल (IPL 2023) शेवटचा हंगाम खेळत असल्याचंही स्पष्ट झालं आहे.
MS Dhoni Reaction CSK vs SRH : आयपीएलमध्ये (IPL 2023) चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) 7 विकेट्सने पराभव केला. हैदराबादने चेन्नईला सामना जिंकण्यासाठी 135 धावांचं लक्ष्य दिलं होतं. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने 18.4 षटकांत 3 विकेट्स राखून हा सामना जिंकला. चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाचा हिरो सलामीवीर डेवॉन कॉनवे ठरला. कॉनवेने 57 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या. यामध्ये त्याने खेळीत 12 चौकार आणि एक षटकार ठोकला.
'हा माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा...'
हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात विजयानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. धोनी म्हणाला की, ''आम्ही जे बोललो ते आम्ही केलं आहे. हा माझ्या कारकिर्दीचा शेवटचा टप्पा आहे, त्यामुळे मी त्याचा जास्तीत जास्त आनंद आणि मजा घेत खेळण्याचा प्रयत्न करत आहे. एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळणं नेहमीच खास राहिलं आहे. इथल्या लोकांनी खूप प्रेम आणि आपुलकी दिली आहे. चेपॉक स्टेडिअमवर लोक मला पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी शेवटपर्यंत वाट पाहत असतात.''
पाहा Video : नेमकं काय म्हणाला धोनी...
MS Dhoni shares a special story on Rahul Dravid and also remembers Sachin Tendulkar.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 21, 2023
It's so pleasing to hear MS in the presentation ceremony! pic.twitter.com/OaOv9fGaRz
धोनाचा शेवटचा आयपीएल हंगाम
दरम्यान, धोनीने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, या मोसमानंतर तो पुन्हा मैदानावर खेळताना दिसणार नाही. सनरायझर्स हैदराबादचा सात गडी राखून पराभव केल्यानंतर धोनीने प्रतिक्रिया देताना हे स्पष्ट केलं आहे. चेन्नईतील प्रेक्षकांकडून मला जे प्रेम मिळत आहे त्यामुळे भारावून गेल्याचं धोनीनं सांगितलं. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी म्हणाला की, दोन वर्षांनंतर प्रेक्षकांना सामना पाहण्याची संधी मिळाली असून त्यांच्यासमोर खेळणं खूप खास आहे.
चेन्नईचा हैदराबादवर सात विकेटने विजय
रविंद्र जाडेजाचा भेदक मारा आणि डेवॉन कॉनवे याचे वादळी अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने हैदराबदचा सात विकेटने पराभव केला. हैदराबादने दिलेले 135 धावांचे आव्हान चेन्नईने सात विकेट आणि आठ चेंडू राखून आरामात पार केले. चेन्नईकडून डेवॉन कॉनवे याने नाबाद 77 धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :