(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MS Dhoni : धोनीभाईचा फॅन म्हणजे विषय खोल, 'या' एका कारणासाठी गर्लफ्रेंडला बायबाय; पोस्टरची सगळीकडे चर्चा!
CSK vs SRH : आयपीएलमध्ये काल झालेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जनं सनरायजर्स हैदरबादला 78 धावांनी पराभूत केलं आहे.
चेन्नई : महेंद्रसिंह धोनीचे (MS Dhoni ) चाहते चेन्नई सुपर किंग्जची (Chennai Super Kings) ज्या मैदानावर मॅच असेल तिथं मोठी गर्दी करत आहेत. धोनीची बॅटिंग करतानाची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. चेन्नई, मुंबई, लखनौमध्ये धोनीच्या लोकप्रियतेची झलक पाहायला मिळत आहे. चेन्नईमध्ये चेपॉकवर देखील काल धोनीच्या लोकप्रियतेची झलक पाहायला मिळाली. महेंद्रसिंह धोनी 20 व्या ओव्हरमध्ये फलंदाजीला आला होता. धोनीचं चेन्नईच्या प्रेक्षकांनी जल्लोषात स्वागत केलं आहे. चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्त्व यंदा ऋतुराज गायकवाड करत असला तरी धोनीची क्रेझ काय कमी झालेली नाही. धोनीचे चाहते चेपॉकवर मोठ्या संख्येनं दाखल झाले होते. धोनीचा एक अनोखा चाहता दिसून आला. धोनच्या एका चाहत्यानं मैदानात झळकावलेलं पोस्टर (MS Dhoni Fan Poster) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल पोस्टरवर नेमकं काय लिहिलेलं?
धोनीचा चाहता मैदानावर एक पोस्टर घेऊन पोहोचला. कॅमेरामननी ते पोस्टर टिपलं. धोनीच्या चाहत्यानं पोस्टरवर म्हटलं की "माझ्या गर्ल्डफ्रेंडसोबत ब्रेकअप केलंय, कारण तिच्या नावात 7 अक्षरं नव्हती".धोनीच्या जर्सीचा नंबर 7 आहे. त्याशिवाय धोनीची जन्मतारीख 7 जुलै असतो. धोनीचं 7 या क्रमांकाशी विशेष नातं आहे. त्यामुळं धोनीच्या चाहत्यानं म्हटलं की तिच्या नावात सात अक्षरं नव्हती त्यामुळं ब्रेकअप केलं. चाहत्याचं हे अजब पोस्टर जोरदार व्हायरल होत आहे.
व्हायरल पोस्टर
Fans at the Chepauk. 😄👌 pic.twitter.com/Qmk3pq4b0V
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 28, 2024
चेन्नई सुपर किंग्जची गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप
चेन्नई सुपर किंग्जनं ज्या मॅचमध्ये विजय आवश्यक होता त्याच मॅचमध्ये विजय मिळवत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या नावावर पाच मॅचमधील विजयांसह 10 गुण आहेत. चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाज आणि बॉलर्सनी केलेल्या दमदार कामगिरीमुळं होमग्राऊंडव चेन्नईला विजय मिळाला. चेन्नई सुपर किंग्जनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 3 विकेटवर 212 धावा केल्या होत्या. तर, सनरायजर्स हैदराबादला टॉस जिंकूनही पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय महागात पडला. चेन्नईनं पहिल्यांदा 212 धावा केल्यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांचा जम बसू दिला नाही. सनरायजर्स हैदराबादला 134 धावांवर बाद चेन्नईनं 78 धावांनी विजय मिळवला. यासह नेट रनरेटच्या आधारे गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद, लखनौ सुपर जाएंटस आणि दिल्ली कॅपिटल्सच्या नावावर 10 गुण आहेत.
संबंधित बातम्या :
IPL 2024: 'ग्लेन मॅक्सवेल जे करु शकतो, ते विराट कोहली नाही...'; गौतम गंभीरच्या विधानाची रंगली चर्चा
Sakshi Dhoni :साक्षीची चेन्नईच्या टीमला खास विनंती, म्हणाली मॅच लवकर संपवा 'बेबी आने वाला है...'