IPL 2024: 'ग्लेन मॅक्सवेल जे करु शकतो, ते विराट कोहली नाही...'; गौतम गंभीरच्या विधानाची रंगली चर्चा
IPL 2024 Gautam Gambhir On Virat Kohli: विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटवरुन आता कोलकाता नाइट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीरने देखील भाष्य केलं आहे.
IPL 2024 Gautam Gambhir On Virat Kohli: आयसीसी टी-20 विश्वचषकापूर्वी विराट कोहलीला त्याच्या आयपीएलमधील स्ट्राईक रेटमुळे प्रचंड ट्रोल केले जात आहे. या हंगामात विराट कोहली 147.49 च्या स्ट्राईक रेटने खेळत आहे. या हंगामात 10 सामन्यात विराट कोहलीने आतापर्यंत 71.43 च्या सरासरीने 500 धावा केल्या आहेत. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध 44 चेंडूत 70 धावा करून आरसीबीच्या 9 गडी राखून मोठ्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटवरुन आता कोलकाता नाइट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीरने देखील भाष्य केलं आहे.
RCB CHASED DOWN 200+ TOTAL SUCCESSFULLY AFTER 14 LONG YEARS. 🤯💥
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 28, 2024
- Will Jacks and King Kohli are the heroes. ⭐pic.twitter.com/GMHjXvkELJ
गुजरातविरुद्धच्या सामन्यानंतर विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन बोलणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. लोक कितीही बोलत असले तरी संघाला विजय मिळवून देणे हेच माझे ध्येय असल्याचं कोहलीने सांगितले. स्ट्राईक रेटबद्दल आणि फिरकीला नीट खेळू न शकणारे लोकच या गोष्टी बोलत आहेत. संघाला जिंकण्यासाठी मदत करणे हेच माझे ध्येय आहे आणि म्हणूनच मी माझ्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी दररोज हे करू शकलो, मला माहित नाही की या लोकांनी अशा परिस्थितीचा सामना केला आहे, असं विराट कोहलीने सांगितले.
गौतम गंभीर काय म्हणाला? (Gautam Gambhir On Virat Kohli)
प्रत्येक खेळाडूच्या खेळण्याची शैली ही वेगवेगळी असते. खेळाडूंच्या स्ट्राईक रेटपेक्षा संघाचा विजय महत्वाचा असतो. विराट कोहली एक वेगळा खेळाडू आहे. त्यामुळे जे काम ग्लेन मॅक्सवेल करु शकतो, ते काम विराट कोहली करु शकत नाही आणि जे काम विराट कोहली करु शकतो, ते काम ग्लेन मॅक्सवेल करु शकत नाही, असं गौतम गंभीरने म्हणाला.
गंभीरने कोहलीवर उधळली स्तुतिसुमने-
विराटने आमच्यामध्ये झालेल्या गळाभेटीवर भाष्य करताना काही मिश्कील टिप्पणी केली. तो योग्य बोलला आहे. आम्ही एकमेकांची गळाभेट घेतली आणि अनेकांचा मसाला बंद झाला. विराट अप्रतिम खेळाडू असून मला त्याच्याकडून एक गोष्ट शिकायला आवडेल. ती म्हणजे डान्स. तो खूप भारी डान्स करतो याचे सर्वजण साक्षीदार आहेत, असेही गौतम गंभीरने सांगितले.
कोहलीने 500 धावा केल्या पूर्ण-
विराट कोहलीने IPL 2024 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात 44 चेंडूत 70 धावांची खेळी करत 500 धावा पूर्ण केल्या आहेत. चालू मोसमात अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात कोहलीने एका मोसमात 500 धावांचा आकडा गाठण्याची ही 7वी वेळ आहे. आयपीएलच्या चालू हंगामात त्याने 4 अर्धशतकं आणि 1 शतकी खेळीही खेळली आहे. यासह कोहली आयपीएलच्या इतिहासात 8 हजार धावा पूर्ण करण्याच्या जवळ आला आहे.