एक्स्प्लोर

धोनी IPL 2023 मध्ये नवा विक्रम रचण्याच्या तयारीत; 5000 धावांचा टप्पा पूर्ण करणार

MS Dhoni Giant Milestone in IPL : महेंद्र सिंग धोनी आयपीएलमध्ये 5000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त एक पाऊल दूर आहे.

Dhoni in cusp of Completing 5000 Runs in IPL : भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कॅप्टन महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) एका नव्या विक्रमाला गवसणी घालण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. आयपीएलच्या (IPL 2023) यंदाच्या हंगामाच्या गुजरातविरुद्धच्या (Gujrat Titans) पहिल्याच सामन्यात चेन्नई संघाचा (Chennai Super Kings) कर्णधार धोनी एक नवा विक्रम करण्याच्या तयारीत आहे. धोनी आयपीएलमध्ये 5000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त एक पाऊल दूर आहे.

धोनी IPL 2023 मध्ये नवा विक्रम रचण्याच्या तयारीत

2008 साली आयपीएलच्यास पहिल्या हंगामाला सुरुवात झाल्यापासून धोनी सर्व 16 सीझनमध्ये सहभागी झाला आहे. यंदाच्या गतविजेत्या गुजरात विरुद्धच्या सामन्यात धोनी आयपीएलमध्ये एक टप्पा गाठण्यासाठी सज्ज आहे. धोनी लवकरच इंडियन प्रीमियर लीगमध्ये 5000 धावांचा टप्पा पूर्ण करणार आहे. यासह धोनी आयपीएलच्या इतिहासात 5000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा केवळ सातवा खेळाडू ठरणार आहे. या विक्रमाला गवसणी घालण्यासाठी धोनी फक्त काही धावांची गरज आहे. 

5000 धावांचा टप्पा पूर्ण करणार

आयपीएलमध्ये धोनीनं चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स (Rising Pune Supergiant) या दोन फ्रँचायझींचे नेतृत्त्व केलं आहे. सध्या आयपीएल टी20 लीगमध्ये धोनीच्या नावावर 4978 धावा आहेत. गुजरात टायटन्सविरुद्धच्या आयपीएल 2023 च्या सलामीच्या सामन्यात धोनीने आणखी 22 धावा केल्या तर आयपीएल मध्ये 5000 धावांचा टप्पा पार करेल.

5000 Runs in IPL : आयपीएलमध्ये 5000 धावा पूर्ण करणारे खेळाडू

दरम्यान, आयपीएलमध्ये 5000 धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) याचा पहिला क्रमांक आहे. कोहलीच्या नावावर 223 सामन्यांत 6624 धावा आहेत. त्याच्यापाठोपाठ शिखर धवन (Shikhar Dhawan) तिसऱ्या क्रमांकावर असून त्याच्या नावावर 6244 धावा आहे. यानंतर डेव्हिड वॉर्नर (David Warner), रोहित शर्मा (Rohit Sharma), सुरेश रैना (Suresh Raina) आणि एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) या खेळाडूंचा क्रमांक लागतो.

धोनी पहिल्याच सामन्यातून बाहेर?

दरम्यान, धोनीला सराव सत्रात दुखापत झाल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 41 वर्षाच्या महेंद्र सिंग धोनीला चेन्नईमध्ये सराव सत्रावेळी डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गुरुवारी संघाच्या मोटेरा स्टेडिअमवरील सराव सत्रात धोनी सहभागी नव्हता. चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांना याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, 'कर्णधार धोनी 100 टक्के फिट असून आजचा सामना खेळेल.'

महत्वाच्या इतर बातम्या :

IPL 2023 मध्ये 11 ऐवजी 12 खेळाडू! यंदाच्या आयपीएलमध्ये बदलले 'हे' पाच नियम, टॉसनंतर ठरणार प्लेइंग 11

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget