MS Dhoni : धोनी आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार, रोहित-विराट आसपासही नाहीत
Most Successful IPL Captain: धोनीने (MS Dhoni) चेन्नईल (CSK) आतापर्यंत चार वेळा आयपील चषक उंचावून दिला आहे.
Most Successful IPL Captain, MS Dhoni : आयपीएलच्या (IPL 2023) रणसंग्रम सुरुवात होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडिअयवर चेन्नई (CSK) आणि गुजरात (Gujarat Titans) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. धोनी पुन्हा एकदा चेन्नईचे नेतृत्व करताना दिसणार आहे. धोनीने चेन्नईल आतापर्यंत चार वेळा आयपील चषक उंचावून दिला आहे. आतापर्यंत धोनी आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. सर्वाधिक चषक उंचावण्यात धोनी दुसऱ्या क्रमांकावर असला तरी सर्वाधिक विजय धोनीच्या नावावर आहेत. रोहित शर्माने सर्वाधिक पाच वेळा चषक उंचावला आहे. पण सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे.
धोनी आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून चेन्नईची धुरा सांभाळत आहे. 2008 पासून धोनी चेन्नईचे नेतृत्व करत आहे. धोनीने कर्णधार म्हणून आतापर्यंत 210 सामने खेळले आहेत. यामध्ये 123 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर 86 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. धोनी आयपीलमधील सर्वाधिक सामने खेळणारा कर्णधार आहे. त्याशिाय सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रमही धोनीच्याच नावावर आहे. धोनी चेन्नई आणि पुणे संघासाठी आयपीएल खेळला आहे.
सर्वाधिक सामने खेळणाऱ्या कर्णधारामध्ये रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मा 143 सामन्यात कर्णधार होता, यामध्ये 79 सामन्यात विजय तर 60 सामन्यात पराभव मिळाला. रोहित शर्माशिवाय विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे तर गौतम गंभीर चौथ्या क्रमांकावर आहे.
100 पेक्षा जास्त सामने जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार
महेंद्र सिंह धोनी आयपीएलच्या इतिहासात 100 पेक्षा जास्त सामने जिंकणारा एकमेव कर्णधार आहे. आतापर्यंत एकाही कर्णधाराला हा कारनामा करता आलेला नाही.
धोनीनंतर कर्णधार कोण?
हा धोनीचा अखेरचा आयपीएल हंगाम असल्याची चर्चा आहे. अशात महेंद्रसिंग धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्जची कमान गायकवाडकडे सोपवली जाणार की स्टोक्सकडे, असा याची चर्चा आहे. चेन्नई सुपर किंग्जचा आगामी कर्णधारपदाच्या शर्यतीत युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड आघाडीवर आहे. याचे कारण तो एक भारतीय खेळाडू आहे आणि त्यामुळे तो कॅप्टन असताना संघाच्या कॉम्बिनेशनमध्ये फारशी अडचण येणार नाही. दुसरीकडे, गायकवाड याला कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे, तो डॉमेस्टीक क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार असून महाराष्ट्र संघाची कामगिरीही चांगली असल्याचं दिसून आलं आहे. कर्णधार असताना त्याने फलंदाजीतही चांगली कामगिरी केली असल्याने त्याला कर्णधारपदाचा एक तगडा उमेदवार मानलं जात आहे.
यंदा चेन्नईचे वेळापत्रक कसे आहे?
31 मार्च 2023- चेन्नई सुपर किंग्स vs गुजरात टायटंस- नरेन्द्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
2 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs लखनऊ सुपर जॉइंट्स- चेपक स्टेडियम, चेन्नई
8 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम, मुंबई
12 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vsराजस्थान रॉयल्स, चेपक स्टेडियम, चेन्नई
17 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलोर
21 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vsसनराइजर्स हैदराबाद, चेपक स्टेडियम, चेन्नई
23 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाइट राइडर्स, ईडेन गार्डेन स्टेडियम, कोलकाता
27 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs राजस्थान रॉयल्स, जयपुर
30 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs पंजाब किंग्स, चेपक स्टेडियम, चेन्नई
4 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs लखनऊ सुपर जॉइंट्स, इकाना स्टेडियम, लखनऊ
6 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियन्स, चेपक स्टेडियम, चेन्नई
10 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स, चेपक स्टेडियम, चेन्नई
14 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाइट राइडर्स, चेपक स्टेडियम, चेन्नई
20 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स, अरूण जेटली स्टेडियम, दिल्ली