Mitchell Owen to Join PBKS : पंजाब किंग्सने ग्लेन मॅक्सवेलच्या जागी तगडा खेळाडू खरेदी केला; पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून भारतात आणला, किती कोटी रुपये दिले?
Punjab Kings IPL 2025 : काही दिवसांपूर्वी आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला.

Punjab Kings sign Mitch Owen to replace injured Glenn Maxwell : काही दिवसांपूर्वी आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला. पंजाबचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर गेला. प्लेऑफपूर्वी मॅक्सवेलचे बाहेर पडणे हा पंजाबसाठी मोठा धक्का आहे. पण पंजाब संघाने आपल्या संघात एका नवीन तगड्या खेळाडूची भर घातली आहे. मॅक्सवेलची जागा पाकिस्तान सुपर लीगमधील खेळाडू घेतला आहे.
पंजाबमध्ये एका नवीन खेळाडूची एन्ट्री
ग्लेन मॅक्सवेल आयपीएल 2025 मधून बाहेर पडल्यानंतर पंजाब किंग्जने मिचेल ओवेनला करारबद्ध केले आहे. मॅक्सवेलच्या बोटाला फ्रॅक्चर झाले आहे. या हंगामात त्याने सात सामन्यांमध्ये फक्त 48 धावा केल्या, त्याची सरासरी फक्त 8 आणि स्ट्राईक रेट 97.95 होता. ओवेन हा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू आहे. ओवेन आल्यामुळे पंजाब किंग्जचा संघ अधिक तगडा दिसत आहे. या हंगामात मॅक्सवेल फेल ठरला. आयपीएल पॉइंट्स टेबलमध्ये पंजाब किंग्ज चौथ्या क्रमांकावर आहे. संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
Punjab Kings pick Mitch Owen as a replacement for the injured Glenn Maxwell.
Details 🔽 #TATAIPL | @PunjabKingsIPL
3 कोटी रुपयांना केला करार...
पंजाब किंग्जने मॅक्सवेलच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल ओवेनला करारबद्ध केले आहे. ओवेन सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पेशावर झल्मी फ्रँचायझीकडून खेळतो. तो 3 कोटी रुपयांच्या शुल्कासह पंजाबमध्ये सामील होईल.
पाकिस्तान सुपर लीगमध्ये कशी होती कामगिरी?
ऑस्ट्रेलियातील टास्मानियाच्या मिशेल ओवेनने 34 टी-20 सामने खेळले आहेत आणि 646 धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि 108 चा सर्वोच्च धावसंख्या आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूच्या नावावर 10 टी-20 विकेट्स देखील आहेत. या हंगामात पीएसएलमध्ये ओवेनने पेशावरकडून 200 धावा केल्या आहेत आणि दोन विकेट घेतल्या आहेत. उजव्या हाताचा टॉप ऑर्डर फलंदाज ओवेन मध्यमगती गोलंदाजी देखील करतो.
🚨 MITCH OWEN HAS REPLACED MAXWELL IN PBKS FOR IPL 2025. 🚨pic.twitter.com/GVESVyw0H1
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 4, 2025
पंजाब किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीत
पंजाब किंग्ज सध्या आयपीएल 2025 मध्ये चौथ्या स्थानावर आहे, जिथे त्यांचे 13 गुण आहेत आणि त्यांचा नेट रन रेट +0.199 आहे. संघाचा पुढील सामना 4 मे रोजी धर्मशाळा येथे ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध होणार आहे. ओवेनचे वेळेवर आगमन संघाच्या प्लेऑफच्या आशांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते.





















