MI vs RCB IPL 2025 : 'रोहितमुळे आम्ही...', आरसीबीविरुद्ध पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या हे काय म्हणाला?
मुंबई इंडियन्सला 12 चेंडूत 28 धावांची गरज होती. हार्दिक पांड्या आणि नमन फलंदाजी करत होते, असे वाटत होते की मुंबई हा सामना जिंकेल पण येथून सामना फिरला.

Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru IPL 2025 : मुंबई इंडियन्सला 12 चेंडूत 28 धावांची गरज होती. हार्दिक पांड्या आणि नमन फलंदाजी करत होते, असे वाटत होते की मुंबई हा सामना जिंकेल पण येथून सामना फिरला. यासामन्यात रोहित शर्मा पुन्हा एकदा डावाची चांगली सुरुवात करताना अपयशी ठरला, त्याने 9 चेंडूत 17 धावा केल्या. त्याला यश दयालने बोल्ड केले. त्याआधी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विराट कोहली (67) आणि रजत पाटीदार (64) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर 221 धावा केल्या. आरसीबीविरुद्ध पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने पण नेमकं कुठे चुकलं हे सांगितले.
हार्दिक पांड्या सामन्यानंतर म्हणाला की, "विकेट खरोखरच चांगली होती... मी स्वतःला एवढेच सांगत होतो. आम्ही दोन हिट्स चुकलो, मला काय बोलावे ते कळत नाही. ज्या प्रकारची विकेट होती, गोलंदाजांकडे बचाव करण्यासाठी फारशा गोष्टी नव्हत्या. तुम्ही फलंदाजांना बोलू शकता, परंतु मी गोलंदाजांवर कठोर होऊ इच्छित नाही. ती एक कठीण खेळपट्टी होती, फारसे पर्याय नव्हते. मी असे म्हणू शकतो की, आमच्या संघाने 5-10 धावा दिल्या, कदाचित 12 धावा जास्त दिल्या."
A smile is what you need after a nail-biting thriller 🫶
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2025
Scorecard ▶️ https://t.co/Arsodkwgqg#TATAIPL | #MIvRCB | @mipaltan | @RCBTweets pic.twitter.com/EAynXaUYcO
एमआय कर्णधार पुढे म्हणाला, "नमन खालच्या क्रमात फलंदाजी करत होता. गेल्या सामन्यात रोहित शर्मा उपलब्ध नव्हता, म्हणून कोणालातरी वर पाठवावे लागले. रोहित परत आल्यानंतर, आम्हाला माहित होते की नमन धीरला खाली यावे लागेल.
तिलकबद्दल हार्दिक पांड्या सामन्यानंतर म्हणाला की, 'मागच्या सामन्यात खूप गोष्टी घडल्या. लोकं त्याबद्दल खूप काही बोलले. पण लोकांना माहित नाही की आदल्या दिवळी त्याच्या बोटाला खूप जोरात लागलं होतं. त्यामुळे तो एक रणनीतीने घेतलेला निर्णय होता, कारण त्याच्या बोटाला लागलेलं होतं. त्यावेळ प्रशिक्षकांना वाटले की त्यावेळी कोणतीतरी नवा फलंदाज येऊन काहीतरी करू शकेल. पण असो आज तिलक खूप चांगला खेळला.'
जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबद्दल हार्दिक पांड्या म्हणाला, "जसप्रीत बुमराहची उपस्थिती या संघाला, जगातील कोणत्याही संघाला खरोखरच खास बनवते. तो आला आणि त्याने त्याचे काम केले, नेहमीच सकारात्मक गोष्टी पाहायला हव्यात आणि जाणून सर्वोत्तम क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत आहोत.
हे ही वाचा -





















