MI vs PBKS, IPL 2023 Live : पंजाबचा मुंबईवर 13 धावांनी विजय
MI vs PBKS, IPL 2023 : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) या दोन संघांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.
LIVE
Background
MI vs PBKS, IPL 2023 : आयपीएल 2023 च्या (IPL 2023) आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) या दोन संघांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. 16 व्या हंगामातील 31 वा सामना आज, 22 एप्रिलला मुंबईच्या घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे.
MI vs PBKS IPL 2023 : मुंबई की पंजाब कोण ठरणार वरचढ?
इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 31 व्या सामन्यात शनिवारी, 22 एप्रिलला पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सामना सामना पंजाब किंग्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे तर, पंजाब सातव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सने मागील सामन्यात हैदराबाद संघाचा त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव केला. तसेच पंजाब किंग्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभवानंतर आज मुंबई विरुद्ध मैदानात उतरणार आहे.
MI vs PBKS Head To Head : हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई (MI) आणि पंजाब (PBKS) या संघांमध्ये आतापर्यंत 29 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई संघाचं पारड किंचित जड दिसून आलं आहे. मुंबई इंडियन्स संघाने 29 पैकी 15 सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्सने 14 सामने जिंकले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
MI vs PBKS IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
मुंबई (Mumbai Indians) आणि पंजाब (Punjab Kings) या दोन संघामध्ये 22 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना मुंबईतील नावखेडे स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
Wankhede Stadium Pitch Report : वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई विरुद्ध पंजाब सामना पाहायला मिळणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नऊ वेळा 180 हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यामध्ये चार वेळा 200 चा टप्पा ओलांडला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या 240/3 आहे. आयपीएलमध्येही असाच प्रकार घडला आहे. येथील सपाट विकेटवर गोलंदाजांना विशेष मदत मिळत नाही. येथील सीमा लहान आहेत आणि आऊटफिल्ड खूप वेगवान आहे.
पंजाबचा मुंबईवर १३ धावांनी विजय
पंजाबचा मुंबईवर 13 धावांनी विजय
अर्शदीपने तिलक वर्माला केले बाद
अर्शदीपने तिलक वर्माला केले बाद
मोक्याच्या क्षणी सूर्यकुमार यादव बाद
मोक्याच्या क्षणी सूर्यकुमार यादव बाद झाला आहे. अर्शदीप यादवच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादव बाद झाला. अथर्व तायडेने जबरदस्त झेल घेतला. सूर्या २७ चेंडूत ५६ धावा काढून बाद झाला
सूर्यकुमार यादवचे अर्धशतक
सूर्यकुमार यादवचे अर्धशतक.. मोक्याच्या क्षणी सूर्याने धावांचा पाऊस पाडला.
मुंबईला तिसरा धक्का, कॅमरुन ग्रीन बाद
मुंबईला तिसरा धक्का, कॅमरुन ग्रीन बाद