प्लेऑफसाठी लखनौ पोहचले कोलकात्यामध्ये, पण सामना कुणाशी आज ठरणार
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स, केएल राहुलचा लखनौ सुपर जायंट्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय.
![प्लेऑफसाठी लखनौ पोहचले कोलकात्यामध्ये, पण सामना कुणाशी आज ठरणार lucknow super giants team reaches kolkata for playoff match watch video प्लेऑफसाठी लखनौ पोहचले कोलकात्यामध्ये, पण सामना कुणाशी आज ठरणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/21/7f752aa6325f1326247b01a18f782e11_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2022 : आयपीएल 2022 आता अखेरच्या टप्प्यामध्ये पोहचला आहे. साखळी सामने संपल्यात जमा आहेत. दिल्ली-मुंबई आणि हैदराबाद-पंजाब यांच्यातील सामन्यानंतर क्वालिफाय सामने सुरु होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स, केएल राहुलचा लखनौ सुपर जायंट्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. आयपीएलमधील साखळी सामने मुंबई आणि पुण्यातील मैदानावर खेळवण्यात आले होते. पण क्वालीफायर 1 आणि एलिमिनेटर कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियम खेळवण्यात येणार आहेत. तर क्लालीफायर 2 आणि फायनलचे सामने अहमदाबाद स्टेडिअमवर होणार आहेत. प्लेऑफमधील सामने खेळण्यासाठी राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघ कोलकातामध्ये पोहचला आहे. सर्व खेळाडूंची कोरोना चाचणीही घेण्यात आली आहे.
View this post on Instagram
लखनौची दमदार कामगिरी -
लखनौ सुपर जायंट्सचा यंदाचा आयपीएलमधील पहिलाच हंगाम होय. पहिल्याच हंगामात राहुलच्या नेतृत्वात लखनौने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. लखनौने चौदा सामन्यात ९ विजय मिळवले आहेत. गुणतालिकेत लखनौचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. राहुलने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. राहुलने लखनौकडून सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. त्याशिवाय क्विंटन डिकॉक, युवा आयुष बदोनी, दीपक हुड्डा यांनीही मोलाची कामगिरी केली. फलंदाजीप्रमाणे लखनौचा संघ गोलंदाजीतही तगडा अशल्याचे दिसले.. आवेश खान, मोहसीन खान या भारतीय गोलंदाजांसोबतच जेसन होल्डर चांगली कामगिरी करत आहे.
कोलकातामध्ये होणार प्लेऑफचे दोन सामने -
पहिला प्लेऑफ सामना : कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानवर क्वालीफायर 1 सामना होणार आहे. गुणतालिकेतील अव्वल दोन संघामध्ये 24 मे रोजी सामना रंगणार आहे. विजेता संघ थेट फायनलमध्ये धडक मारणार आहे. तर पराभूत झालेल्या संघाला एक संधी मिळणार आहे. पराभूत झालेला संघ क्वालीफायर दोन मध्ये खेळणार आहे. एलिमिनेटरचा विजेता संघ क्वालिफायर दोनमध्ये पोहचतो.
दूसरा प्लेऑफ सामना : एलिमिनेटरचा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर खेळवला जाणार आहे. 25 मो रोजी हा सामना होणार आहे. गुणतालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघामध्ये हा सामना रंगणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर राहुलचा लखनौ संघ आहे. चौथ्या क्रमांकाचा संघ आज ठरणार आहे.
प्लेऑफचं वेळापत्रक -
क्वालिफायर 1: गुजरात vs राजस्थान, 24 मे - कोलकाता
एलिमिनेटर: लखनौ vs आरसीबी/दिल्ली, 25 मे - कोलकाता
क्वालिफायर 2 - 27 मे - अहमदाबाद
फायनल: 29 मे - अहमदाबाद
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)