Eliminator : कुणाचा पत्ता होणार कट? आरसीबीसमोर लखनौचं 'विराट' आव्हान
LSG vs RCB, Eliminator : आयपीएलच्या 15 व्या हंगामात आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि लखनौ सुपर जायंट्स संघाची लढत होणार आहे.
LSG vs RCB, Eliminator : आयपीएलच्या 15 व्या हंगामात आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि लखनौ सुपर जायंट्स संघाची लढत होणार आहे. दोन्ही संघ एलिमिनेटर सामना जिंकून फायनलच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी मैदानात उतरतील.. पराभूत संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे लढत तगडी होण्याची शक्यता आहे. साखळी सामन्यात लखनौने 14 सामन्यापैकी 9 सामने जिंकले होते. तर आरसीबीने आठ सामन्यात बाजी मारली होती.. लखनौ तिसऱ्या तर आरसीबी चौथ्या क्रमांकावर आहे.
आरसीबीच्या अखेरच्या साखळी सामन्यात विराट कोहलीने 73 धावांची विस्फोटक खेळी करत फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले होते.. आज पुन्हा एकदा विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची आरसीबीला आपेक्षा असणार आहे. आरसीबीसाठी आणखी एक जमेची बाजू म्हणजे, कर्णधार फाफ डु प्लेसिसला मोठ्या सामन्यात खेळण्याचा अनुभव आहे. फाफने प्लेऑपच्या तीन सामन्यात सामनाविर पुरस्कार मिळवले आहेत. तर दुसरीकडे लखनौचा कर्णधार राहुल आणि क्विंटन डिकॉक तुफान फॉर्मात आहेत. राहुलने 14 सामन्यात 537 धावांचा पाऊस पाडलाय.
हे खेळाडू आरसीबीला विजय मिळवून देऊ शकतात -
आयपीएलच्या इतिहासात आरसीबीने आठव्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. मुंबई आणि चेन्नईनंतर सर्वाधिकवेळा प्लेऑफ खेळणारा आरसीबीचा संघ आहे. पण आरसीबीला आतापर्यंत एकदाही आयपीएल चषक उंचावता आलेला नाही. अशात विराट कोहली, दिनेश कार्तिक, फाफ डु प्लेसिस, वानिंदु हररंगा, जोश हेजलवुड आणि ग्लेन मॅक्सवेलकडून आरसीबीला मोठ्या आशा आहे.
सिराजचे पुनरागमन?
अखेरच्या साखळी सामन्यात आरसीबीने मोहम्मद सिराजला आराम दिला होता.. त्याच्या जागी सिद्धार्थ कौलला संघात स्थान दिले होते.. पण सिद्धार्थ कौल खपच महागडा ठरला.. त्यामुळे मोक्याच्या सामन्यात सिरजाला पुन्हा संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तसेच कोलकात्याची खेळपट्टी सिरजासाठी पोषक आहे. त्याशिवाय हर्षल पटेलही फिट आहे.
लखनौसाठी या खेळाडूंची कामगिरी महत्वाची -
लखनौ सुपर जायंट्सला आरसीबीचा पराभव करायचा असल्यास कर्णधार केएल राहुल, क्विंटन डिकॉक, दीपक हुड्डा, आवेश खान आणि मोहसिन खान यांना शानदार प्रदर्शन करावे लागेल..
दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
लखनौचा संघ-
क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार), एव्हिन लुईस, दीपक हुडा, कृणाल पंड्या, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौथम, मोहसीन खान, आवेश खान, रवी बिश्नोई
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ-
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल/आकाश दीप, सिद्धार्थ कौल/मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड.