IPL 2023 : विदर्भातील 'त्रिकुट'! आयपीएलमध्ये तीन रांगड्या खेळाडूंची चर्चा, 'या' खेळाडूंसमोर फोल ठरले कोट्यवधींचे खेळाडू
LSG vs PBKS Vidarbha's Quality Trio : लखनौ विरुद्धच्या सामन्यात जिथे महागडे स्टार खेळाडू फेल ठरले, तिथे विदर्भातील अर्थव तायडे, जितेश शर्मा आणि यश ठाकूर या तीन खेळाडूंची दमदार कामगिरी पाहायला मिळाली.
Atharva Taide, Jitesh Sharma, Yash Thakur Vidarbha's Trio : इंडियन प्रीमियर लीगचा यंदाचा सोळावा हंगा सुरु आहे. आयपीएल 2023 मध्ये अनेक खेळाडू प्रकाशझोतात आले आहेत. विशेष म्हणजे अनेक महागडे स्टार खेळाडू फेल ठरत असताना संघाने स्वस्तात खरेदी केलेल्या खेळाडूंची दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे. आयपीलए 2023 मधील 38 व्या सामन्या लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात लढत पाहायला मिळाली. या सामन्यात दिग्गज खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र विदर्भातील तीन रांगडे गडी या सामन्यात चमकले. विदर्भातील तीन खेळाडूंची या सामन्यात शानदार खेळी पाहायला मिळाली.
IPL 2023, LSG vs PBKS : विदर्भातील 'त्रिकुट'! आयपीएलमध्ये तीन रांगड्या खेळाडूंची चर्चा
विशेष म्हणजे या सामन्यात स्टार खेळाडूंकडून निराशा पदरी आल्यावर या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. अर्थव तायडे, जितेश शर्मा आणि यश ठाकूर हे तिन्ही खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाकडून खेळतात. मोहालीमध्ये रंगलेल्या सामन्यात लखनौ संघाने पंजाब किंग्सवर 56 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात विदर्भातील तीन खेळाडूंनी साऱ्यांचं लक्ष वेधलं. पंजाब संघाकडून अर्थव तायडेनं एक हाती झुंज दिली. त्यासह जितेश शर्मानं 24 धावांची महत्त्वाची खेळी केली. यासोबतच लखनौ संघाचा गोलंदाज यश ठाकूर याचीही दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली.
IPL 2023, LSG vs PBKS : 'या' खेळाडूंसमोर फोल ठरले कोट्यवधींचे खेळाडू
Atharva Taide,Jitesh and Yash Thakur playing today. Vidarbha's quality whiteball trio.
— Stephen N (@albatrosscric) April 28, 2023
या सामन्यात लखनौ पहिल्यांदा फलंदाजी करत 257 धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब संघ 20 षटकात केवळ 201 धावाच करु शकला. पंजाब संघाकडून मराठमोळा अर्थव तावडे याने झुंज देत 36 चेंडूंत 66 धावांची खेळी केली. तर जितेश शर्मानं 10 चेंडूंत 24 धावांची स्फोटक खेळी केली. दुसरीकडे यश ठाकूरनंही चार विकेट घेत सर्वांचं लक्ष वेधलं.
Who is Atharva Taide : अथर्व तायडे
अथर्व तायडे हा मूळचा अकोल्याचा आहे. अर्थवचा जन्म 26 एप्रिल 2000 रोजी झाला असून तो सध्या 23 वर्षांचा आहे. डावखुरा फलंदाज अथर्व तायडे आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. वयाच्या आठव्या वर्षापासून अकोला क्रिकेट क्लबवर खेळणाऱ्या अथर्वने यापूर्वी 16, 19, 23 वर्षाखालील विदर्भ व मध्य विभाग क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तो 19 आणि 23 वर्षाखालील भारतीय संघाकडूनही खेळला आहे. विदर्भ रणजी विजेत्या संघाकडून इराणी टॉफीतही सहभागी झाला होता. पंजाब किंग्सने अथर्व तायडे याला 20 लाख रुपयांत आपल्या ताफ्यात घेतले होते.
Who is Jitesh Sharma : जितेश शर्मा
जितेश शर्माचा जन्म 22 ऑक्टोबर 1993 रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथील आहे. देशांतर्गत क्रिकेटपटू खेळाडू आहे. त्याने 2014 मध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. 29 वर्षीय जितेश देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रामुख्याने विदर्भ संघासाठी खेळतो. सध्या आयपीएल 2023 मध्ये तो पंजाब संघाचा भाग आहे. विदर्भातील यष्टीरक्षक आणि फलंदाज जितेश शर्माने 54 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने 141.83 च्या स्ट्राइक रेटने 1329 धावा केल्या आहेत. पंजाब किंग्स संघाने 20 लाख रुपयांना विकत घेतलं. यापूर्वी, जानेवारी 2023 मध्ये जितेश शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या भारताच्या टी20I संघात जखमी संजू सॅमसनची जागा घेतली होती.
Who is Yash Thakur : यश ठाकूर
यश ठाकूरचा जन्म 28 डिसेंबर 1998 रोजी कोलकाता, पश्चिम बंगालमध्ये झाला. यश 24 वर्षांचा असून देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाकडून खेळतो. आयपीएल 2023 मध्ये तो लखनौ सुपर जायंट्स संघाचा (LSG) भाग आहे. यश ठाकूर उत्तम गोलंदाज असल्याचं त्यानं यंदाच्या आयपीएलमध्ये सिद्ध केलं आहे. यश 2017 पासून विदर्भ देशांतर्गत संघासाठी क्रिकेट खेळत आहे. लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2023 च्या हंगामासाठी त्याला 45 लाख किमतीला खरेदी केलं आहे. यंदाचा त्याने चेन्नई विरोधातील सामन्यात आयपीएल 2023 मध्ये पदार्पण केलं.