(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LSG vs DC IPL 2024: लखनौला पराभवाचा धक्का, केएल. राहुलचं लॉजिक फेल ठरलं, रिषभपचा एक निर्णय गेमचेंजर
LSG vs DC IPL 2024: आज आयपीएल 2024 च्या हंगामात लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा (DC) सामना होणार आहे.
LIVE
Background
Lucknow Super Giants vs Delhi Capitals IPL 2024: आज आयपीएल 2024 च्या हंगामात लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा (DC) सामना होणार आहे. हा सामना एकाना मैदानात रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजचा हा सामना सुरु होईल.
दिल्लीनं लखनौचा विजयरथ रोखला, रिषभ पंतच्या सेनेचा दुसरा विजय
दिल्ली कॅपिटल्सनं लखनौ सुपर जाएंटसं दिलेलं 167 धावांचं आव्हान यशस्वीपणे पार केलं आहे. दिल्लीनं आज स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला आहे.
दिल्लीला लागोपाठ दोन धक्के, फ्रेजर मैक्गर्क आणि रिषभ पंत बाद
दिल्लीला लागोपाठ दोन धक्के बसले आहेत. दिल्लीला विजय मिळवून देतील असं वाटत असताना फ्रेजर मैक्गर्क आणि रिषभ पंत लागोपाठ बाद झाले. रिषभ पंतनं 41 तर फ्रेजर मैक्गर्कनं 55 धावा केल्या.
दिल्लीच्या 100 धावा पूर्ण, पंत -फ्रेजर मैक्गर्कनं डाव सावरला
दिल्लीच्या 100 धावा पूर्ण झाल्या असून पंत -फ्रेजर मैक्गर्कनं 50 धावांची भागिदारी करत दिल्लीचा डाव सावरला आहे.
दिल्लीला दुसरा धक्का, पृथ्वी शॉ बाद
दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का बसला आहे. पृथ्वी शॉला 32 धावांवर रवि बिष्णोईनं बाद केलं.
दिल्लीला पहिला धक्का, डेव्हिड वॉर्नर बाद
दिल्ली पहिला धक्का बसला असून डेव्हिड वॉर्नर 8 धावा करुन बाद झाला.