IPL 2023, Jason Roy : श्रेयस अय्यरच्या जागी कोलकाता संघात इंग्लंडच्या धडाकेबाज खेळाडूला संधी, KKRनं जेसन रॉयल दुप्पट किमतीला विकत घेतलं
KKR Jason Roy, IPL 2023 : कोलकाता संघाने फलंदाज श्रेयस अय्यरच्या जागी संघात जेसन रॉयला संघात सामील केलं आहे. केकेआने त्याला 2.8 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे.
IPL 2023, KKR vs RCB : आयपीएल 16 (IPL 2023) मध्ये पुढच्या सामन्याआधी कोलकाताने (Kolkata Knight Riders) संघात मोठा बदल केला आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने स्टार अष्टपैलू शाकिब अल हसनच्या जागी इंग्लंडच्या धडाकेबाज फलंदाजाचा समावेश केला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) इंग्लंडच्या जेसन रॉयचा (Jason Roy) संघात समावेश केला आहे. केकआर (KKR) आयपीएल 2023 (IPL 2023) साठी जेसन रॉयला 2.8 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. कोलकाता संघाचा खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) या हंगामासाठी उपलब्ध नाही.
कोलकाताने जेसन रॉयला दुप्पट किमतीला विकत घेतलं
आयपीएल 2023 (IPL 2023) साठी, कोलकाता नाईट रायडर्स संघाने 2.8 कोटी रुपये मोजून जेसन रॉयचा संघात सामील केलं आहे. आयपीएल लिलावात तो अन-सोल्ड राहिला होता. लिलावात रॉयची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये होती. आता कोलकाताने जेसनला सुमारे दुप्पट किंमत देऊन संघाचा भाग बनवलं आहे. रॉय इंग्लंडकडून तिन्ही फॉरमॅट खेळतो.
शाकिब अल हसनला केकेआरने डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या मिनी लिलावात 1.5 कोटींची किंमतीला विकत घेतलं होतं. परंतु काही कारणांमुळे तो स्पर्धेचा भाग होऊ शकणार नाही. आता त्याच्या जागी जेसन रॉय केकेआर संघाचा भाग बनला आहे. दुसरीकडे केकेआर आणि बांगलादेश संघाचा खेळाडू लिटन दास देखील आयर्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळल्यानंतरच केकेआरच्या कॅम्पमध्ये सामील होणार आहे.
RCB Playing XI : आरसीबी संभाव्य प्लेईंग 11
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, डीजे विली, अनुज रावत, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आकाश दीप, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, कर्ण शर्मा.
KKR Playing XI : कोलकाता संभाव्य प्लेईंग 11
रिंकू सिंह, नितीश राणा (कर्णधार), वॉरियर, जेसन रॉय, आदि रसेल, सुनिल नारायण, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव.
लाईव्ह सामना कुठे पाहाल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' ॲपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :