DC vs KKR IPL 2025 : राजधानी सुपरफास्ट एक्सप्रेस रुळावरून घसरली! घरच्या मैदानावर दिल्लीचा सलग दुसरा पराभव, केकेआरच्या आशा जिवंत
Kolkata Knight Riders beat Delhi Capitals IPL 2025 : आयपीएल 2025 चा 48 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये खेळला गेला.

Kolkata Knight Riders VS Delhi Capitals IPL 2025 : आयपीएल 2025 चा 48 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये खेळला गेला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कोलकाता संघाने 14 धावांनी विजय मिळवला. यामुळे दिल्लीला पुन्हा एकदा घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. त्याच वेळी, कोलकाता नाईट रायडर्सने या विजयासह प्लेऑफच्या शर्यतीत स्वतःला जिवंत ठेवले आहे. या सामन्यात केकेआरच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो सुनील नारायण होता. त्याने बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये उत्तम कामगिरी केली.
The 𝙆𝙣𝙞𝙜𝙝𝙩𝙨 brought their A-game when they needed it 💜@KKRiders hold their nerve to secure a 1️⃣4️⃣-run victory 👏
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2025
Scorecatd ▶ https://t.co/saNudbWaXT #TATAIPL | #DCvKKR pic.twitter.com/odYyOvoU3g
रहमानउल्लाह गुरबाज आणि सुनील नारायणकडून तोडफोड सुरुवात
कोलकाता नाईट रायडर्ससाठी रहमानउल्लाह गुरबाज आणि सुनील नारायण यांच्या जोडीने पुन्हा एकदा तोडफोड सुरुवात करून दिली. यावेळी दोघांनीही स्फोटक फलंदाजी केली आणि फक्त 3 षटकांत 48 धावा केल्या. ही भागीदारी मिचेल स्टार्कने मोडली आणि त्याने गुरबाजला (12 चेंडू 26 धावा) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सुनीलने 16 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 27 धावा केल्या.
Zooming through at the moment! 🚀
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2025
Captain Ajinkya Rahane and Sunil Narine with some delightful shots 🤌#KKR 79/1 after 6 overs.
Updates ▶ https://t.co/saNudbWaXT #TATAIPL | #DCvKKR | @KKRiders | @ajinkyarahane88 pic.twitter.com/3VKUTcTB0i
उपकर्णधार वेंकटेश अय्यर पुन्हा नापास!
कर्णधार अजिंक्य रहाणेने सलामीवीरांनी दिलेल्या जलद सुरुवातीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पण तो मोठी खेळी खेळू शकला नाही. रहाणेने 14 चेंडूत 26 धावा केल्या. वेंकटेश अय्यर फक्त 7 धावा करून बाद झाला. अंगकृष रघुवंशी हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता आणि त्याने 32 चेंडूत 44 धावांचे योगदान दिले. रिंकू सिंगनेही काही चांगले फटके खेळले पण नंतर तोही 25 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 36 धावा करून तंबुत परतला.
Into the act straight away 😎
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2025
Captain Axar Patel is leading #DC's roar 🔥
Updates ▶ https://t.co/saNudbWaXT #TATAIPL | #DCvKKR | @akshar2026 pic.twitter.com/sH0Ln5dKQd
आंद्रे रसेल आणि रोवमन पॉवेल ठरले फेल
कोलकाता नाईट रायडर्सने 18 व्या षटकात 177 धावांवर सहावी विकेट गमावली आणि येथून आंद्रे रसेल-रोव्हमन पॉवेलवर डाव चांगला संपवण्याची जबाबदारी घेतली, पण तसे झाले नाही. पॉवेलला 5 चेंडूत फक्त 5 धावा करता आल्या. तर रसेलने 9 चेंडूत 17 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या तर विप्रज निगम आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. त्याच वेळी, दुष्मंथा चामीरा हिने तिच्या नावावर यश मिळवले.
Two moments of brilliance ✌
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2025
Andre Russell's 1️⃣0️⃣6️⃣m six 🤩
Dushmantha Chameera's spectacular grab 🤯
Which was your favourite out of the two? ✍
Scorecard ▶ https://t.co/saNudbWINr #TATAIPL | #DCvKKR | @KKRiders | @DelhiCapitals pic.twitter.com/9griw9ji4f
केएल राहुल फेल! फाफ डु प्लेसिस नडला, पण...
205 धावांच्या पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खुपच झाली. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अनुकुल रॉयने अभिषेक पोरेलला आऊट केले. यानंतर, पाचव्या षटकात करुण नायरनेही आपली विकेट गमावली. करुणच्या बॅटमधून 15 धावा आल्या. वैभव अरोराने त्याची शिकार केली. यानंतर केएल राहुलकडून मोठी खेळी अपेक्षित होती. पण केएल राहुल सातव्या षटकात धावबाद झाला. राहुलच्या बॅटमधून फक्त 7 धावा आल्या. पण, यानंतर कर्णधार अक्षर पटेल आणि फाफ डु प्लेसिसमध्ये चांगली भागीदारी झाली.
𝙁𝙖𝙛𝙪𝙡𝙤𝙪𝙨 𝙁𝙞𝙛𝙩𝙮 😎
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2025
Second half-century of the season for Faf du Plessis 🔥
Will he guide #DC home at home? 🤔🏡
Updates ▶ https://t.co/saNudbWaXT #TATAIPL | #DCvKKR | @faf1307 pic.twitter.com/DMp3E6jGo2
याशिवाय, इतर सर्व फलंदाज अपयशी ठरले, ज्यामुळे दिल्ली संघ 20 षटकांत 9 गडी गमावून फक्त 190 धावा करू शकला. दुसरीकडे, सुनील नारायणने 4 षटकांत 29 धावा देत 3 फलंदाजांचे बळी घेतले. त्याच्याशिवाय वरुण चक्रवर्तीने 2, वैभव अरोरा, आंद्रे रसेल आणि अनुकुल रॉय यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.





















