(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL Captains : 16 वर्षात कोणत्या संघाने किती कर्णधार बदलले, जाणून घ्या एका क्लिकवर
IPL Captains : आयपीएलच्या 16 हंगामाला (IPL 2023) 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. गुजरात आणि चेन्नई या सामन्याने आयपीएल 2023 ला सुरुवात होणार आहे.
IPL Captains : आयपीएलच्या 16 हंगामाला (IPL 2023) 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. गुजरात आणि चेन्नई या सामन्याने आयपीएल 2023 ला सुरुवात होणार आहे. सर्व दहा संघांनी आपली तयारी सुरु केली आहे. काही संघ आपल्या नव्या कर्णधाराची नियुक्ती करत आहेत. आजच हैदराबाद संघाने एडन मारक्रमला आपला कर्णधार नियुक्त केले आहे. आतापर्यंत 16 हंगामात अनेक संघानी कर्णधार बदलले आहेत. यामध्ये सर्वाधिक कर्णधार पंजाब संघाने बदलले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचा संघ आहे. विशेष म्हणजे, चेन्नई संघाने आतापर्यंत एकही कर्णधार विदेशी नेमलेला नाही. पाहूयात आतापर्यंत कोण कोणत्या संघाने कितीवेळा कर्णधार बदलला...
पंजाब किंग्सने सर्वाधिक वेळा कर्णधार बदलला -
आयपीएलच्या इतिहासात पंजाब संघाने सर्वाधिक वेळा कर्णधार बदलला आहे. पंजाबने आतापर्यंत 14 वेळा आपला कर्णधार बदलला आहे. आयपीएल 2022 मध्ये पंजाबचं नेतृत्व मयांक अग्रवाल करत होता. तर आता आयपीएल 2023 मध्ये पंजाबने शिखर धवनकडे जबाबदारी सोपवली आहे.
आतापर्यंत कुणी किती वेळा कर्णधार बदलले -
पंजाब किंग्स- 14 कर्णधार
दिल्ली कॅपिटल्स- 12 कर्णधार
सनराजर्स हैदराबाद- 9 कर्णधार
मुंबई इंडियन्स- 7 कर्णधार
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- 7 कर्णधार
राजस्थान रॉयल्स- 6 कर्णधार
कोलकाता नाइट राइडर्स- 6 कर्णधार
पुणे वॉरियर्स इंडिया- 6 कर्णधार
चेन्नई सुपर किंग्स- 3 कर्णधार
रायजिंग सुपर जायंट्स- 3 कर्णधार
डेक्कन चार्जर्स- 4 कर्णधार
बीसीसीआयने आयपीएलच्या 16 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर केले आहे. 31 मार्च ते 28 मे यादरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे. गतविजेते गुजरात आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना होणार आहे. 21 मेपर्यंत लीग सामने होणार आहेत. त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत. तर 28 मे रोजी फायनलचा थरार पाहायला मिळेल. आयपीएल 2023 मध्ये एकूण 74 सामने होणार आहेत. लीग राऊंडमध्ये दहा संघ प्रत्येकी 14-14 सामने खेळणार आहे. याप्रमाणे 10 संघामध्ये 70 सामने होणार आहेत. त्यानंतर प्लेऑफचे चार सामने होणार आहेत. 28 मे रोजी फायनलचा थरार रंगणार आहे. आयपीएल 2023 चं आयोजन भारतातच होणार आहे. देशभरातील 12 मैदानावर सामने रंगणार आहेत. दहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. अ ग्रुपमध्ये मुंबई, राज्यस्थान, दिल्ली आणि लखनौ संघाचा सहभाग आहे. तर ब गटामध्ये चेन्नई, पंजाब, हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात या संघाचा समावेश आहे.
यंदा कोण कुठल्या संघाचा कर्णधार
सनरायजर्स हैदराबाद – एडन मारक्रम
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - फाफ डु प्लेसिस
चेन्नई सुपर किंग्स- महेंद्र सिंह धोनी
कोलकाता नाइट रायडर्स- श्रेयस अय्यर
पंजाब किंग्स – शिखर धवन
दिल्ली कॅपिटल्स- ऋषभ पंत (दुखापतीमुळे यंदा दुसऱ्याकडे जबाबदारी जाऊ शकते)
राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन
मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा
लखनौ सुपर जायंट्स- केएल राहुल
गुजरात टायटन्स- हार्दिक पांड्या