KKR vs SRH : फुल पैसा वसूल मॅच, अखेरच्या ओव्हरमध्ये हैदराबादनं कच खालला, केकेआरची विजयी सुरुवात
SRH vs KKR : कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर झालेल्या आयपीएलच्या तिसऱ्या लढतीत केकेआर नं हैदराबादचा पराभव केला आहे. अखेरच्या ओव्हरमध्ये चार धावांनी हैदराबादचा पराभव झाला.

कोलकाता : आयपीएलच्या 17 व्या पर्वातील तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात ईडन गार्डन्सवर पार पडला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 विकेटवर 208 धावा केल्या होत्या. सनरायजर्स हैदराबाद 20 ओव्हर्समध्ये 7 विकेटवर 204 धावा केल्या. अखेरच्या ओव्हरमध्ये हैदराबादच्या हाताशी आलेला विजय कोलकाताच्या टीमनं हिरावला.
हैदराबादला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 13 धावांची गरज होती. हेन्रिच क्लासेन 56 धावा करुन मैदानावर होता. कोलकातानं हर्षित राना याला अखेरची ओव्हर दिली. हर्षित रानाला पहिल्याच बॉलवर हेन्रिच क्लासेन यानं सिक्स मारला. इथपर्यंत सगळं ठीक होतं. हर्षित रानाच्या दुसऱ्या बॉलवर क्लासेननं एक रन घेतली आहे. यानंतर स्ट्राइकवर शहबाझ अहमद आला. हर्षित रानानं तिसऱ्या बॉलवर हर्षितला आऊट केलं. त्याचा कॅच श्रेयस अय्यरनं घेतला.यानंतर मार्को जन्सेन मैदानावर आला त्यानं एक रन काढून क्लासेनला स्ट्राइक दिली. यानंतर पुढचा बॉल हर्षितनं टाकला या बॉलवर मात्र क्लासेन बाद झाला.
हैदराबादला अखेरच्या बॉलवर विजयासाठी पाच धावांची तर टायसाठी चार धावांची गरज होती. मात्र, हर्षित राणानं अखेरच्या बॉलवर एकही रन दिली नाही.यासह कोलकातानं यंदाच्या आयपीएलची सुरुवात विजयानं केली.
कोलकाताच्या टीमनं हैदराबादसमोर 209 धावांचं आव्हान ठेवलं होतं. अपेक्षेप्रमाणं आजची मॅच हाय स्कोरअरिंग मॅच झाली. कोलकाताकडून आंद्रे रसेलनं फटकेबाजी केली. हैदराबादनं देखील सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी सुरु केली होती.हैदाराबादनं प्रत्येक ओव्हरला 10 चं रनरेट कायम ठेवण्याचा प्रयत्न केला होता.
मंयाक अग्रवाल 32, अभिषेक शर्मा 32 , रजत त्रिपाठी 20, मार्क्रम 18 यानंतर क्लासेनच्या 63 धावा, अब्दुल समद 15, शहबाज अहमद 16 आणि जन्सेन याच्या एका रनच्या जोरावर हैदराबादनं 204 धावांपर्यंत मजल मारली मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही.
कोलकाताला खऱ्या अर्थानं विजय मिळवून दिला असेल तर तो हर्षित राणा यानं त्यांन 4 ओव्हर्समध्ये 33 धावा देत 3 विकेट घेतल्या. हर्षित राणानं 3 विकेट घेतल्या मात्र मिशेल स्टार्कनं 4 ओव्हर्समध्ये 53 धावा दिल्या त्याला एकही विकेट मिळाली नाही. दुसरीकडे वरुण चक्रवर्तीनं 55 धावा दिल्या, त्याला केवळ एक विकेट मिळाली. सुनील नरेनचा स्पेल मात्र महत्त्वाचा ठरला त्यानं 4 ओव्हर्समध्ये 19 धावा देत 1 विकेट काढली. आंद्रे रसेलनं देखील हैदराबादच्या दोन विकेट घेतल्या.
कोलकाताची विजयानं सुरुवात
कोलकाता नाईट रायडर्सनं हैदराबाद विरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात चार धावांनी विजय मिळवला आहे. कोलकाताच्या टीमनं आजच्या विजयासह यंदाच्या आयपीएलची सुरुवात यशस्वीपणे केली आहे.
संबंधित बातम्या :
KKR vs SRH : केकेआरच्या टॉप ऑर्डरनं हैदराबादसमोर नांगी टाकली,श्रेयस अय्यर ते नितीश राणा स्वस्तात बाद
PBKS vs DC : पंजाबच्या ओपनर्सची आक्रमक सुरुवात, इशांत शर्मानं कसा लावला ब्रेक,जाणून घ्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
