KKR Vs RR: कोलकात्यानं सामना जिंकला, राजस्थानचा सात विकेट्सनं पराभव, वाचा सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे
Indian Premier League 2022: मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं राजस्थान रॉयल्सला सात विकेट्स राखून पराभूत केलं आहे.
Indian Premier League 2022: मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं राजस्थान रॉयल्सला सात विकेट्स राखून पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकात्याच्या संघानं राजस्थानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. दरम्यान, राजस्थानच्या संघानं 20 षटकात पाच विकेट्स गमावून 151 धावा केल्या होत्या. नितीश राणा आणि रिंकू सिंहनं संयमी खेळी करत कोलकात्याला सामना जिंकून दिलाय. राजस्थानला पराभूत करून कोलकात्याच्या संघानं या हंगामातील चौथा विजय मिळवला आहे. या विजयासह कोलकात्याच्या संघाचं आठ गुण झाले आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे-
- नाणेफेक जिंकल्यानंतर कोलकात्याच्या संघान प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
- राजस्थानकडून सलामी देण्यासाठी मैदानात आलेल्या जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल स्वस्तात माघारी परतले.
- जोस बटलरनं 22 चेंडूत 25 तर, देवदत्त पडिक्कलनं 5 चेंडूत 2 धावा करून माघारी परतला.
- त्यानंतर कर्णधार संजू सॅमसननं संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला. त्यानं 49 चेंडूत 54 धावा केल्या.
- राजस्थानच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून कोलकात्यासमोर 153 धावांचं लक्ष्य ठेवलं.
- राजस्थानच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली.
- कोलकात्याचा सलामीवीर आरोन फिंच स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर इंद्रजीत बाबनंही पावर प्लेच्या अखेरच्या षटकात आपली विकेट्स गमावली.
- दरम्यान, मैदानात आलेल्या कर्णधार श्रेयस अय्यरनं 32 चेंडूत 34 धावा करून माघारी परतला.
- त्यानंतर नितीश राणा आणि रिंकू सिंहनं संयमी खेळी दाखवत संघाला विजय मिळवून दिला.
- या सामन्यात नितीश राणानं 37 चेंडूत 48 धावा केल्या. तर, रिंकू सिंहनं 23 धावांत 42 धावांची तुफानी खेळी केली.
हे देखील वाचा-