(Source: ECI/ABP News/ABP Majha)
KKR vs RR, Toss Update : कोलकात्याचा संघ प्रथम गोलंदाजी करणार; नाणेफेक जिंकत घेतला निर्णय, पाहा आजची अंतिम 11
कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली आहे. राजस्थानला कमी धावांत रोखून समोरील लक्ष्य पार करण्याची त्यांची रणनीती असणार आहे.
KKR vs RR : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 47 वा सामना आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरले असून कोलकाता संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम गोलंदाजी करुन राजस्थानला कमी धावांत रोखून समोरील लक्ष्य पार करण्याची रणनीती केकेआरची आहे. दोन्ही संघाच्या यंदाच्या हंगामातील कामगिरीचा विचार राजस्थानने आतापर्यंत 9 पैकी 6 सामने जिंकत गुणतालिकेत टाप 4 मध्ये स्थान मिळवलं आहे. तर कोलकात्याचा संघ मात्र 9 पैकी 3 सामने जिंकल्याने अतिशय खालच्या स्थानावर आहे.
आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता कोलकाता संघाने दोन महत्त्वाचे बदल केले आहे. त्यांनी वेंकटेश अय्यरच्या जागी अंकुल रॉयला संधी दिली आहे. तर शिवम मावीच्या जागी हर्षीत राणाला संधी मिळाली आहे. दुसरीकडे राजस्थान संघाने मिचेल डॅरियल मिचेलला विश्रांती देत करुण नायरला संधी दिली आहे. तर नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...
कोलकाता अंतिम 11
अॅरॉन फिंच, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, नितीश राणा, अंकुल रॉय, बाबा इंद्रजीत (विकेटकिपर), आंद्रे रसेल, सुनिल नारायण, उमेश यादव, हर्षीत राणा, टीम साऊथी
राजस्थान अंतिम 11
संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), जोस बटलर, देवदत्त पडीक्कल, करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन आश्विन, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन
हे देखील वाचा-
- IPL 2022 : भविष्यात चेन्नई सुपर किंग्ससोबतच दिसणार MS Dhoni? दिले महत्त्वाचे संकेत
- Prithvi Shaw violates code of conduct: दिल्लीच्या पृथ्वी शॉ ला 25 टक्क्यांचा दंड, आचारसंहितेचा भंग केल्यामुळं कारवाई
- IPL 2022: आयपीएलमध्ये सर्वात मोठ्या भागीदाराचा विक्रम कोणत्या जोडीच्या नावावर? ऋतुराज- कॉन्वेचा यादीत समावेश