एक्स्प्लोर

KKR vs PBKS, IPL 2023 Live: कोलकाता आणि पंजाबमध्ये काटें की टक्कर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

KKR vs PBKS Live Score: अनुभवी शिखर धवनपुढे युवा नीतीश राणा याचे आव्हान आहे. ईडन गार्डन्स मैदानावर कोण बाजी मारणार?

LIVE

Key Events
KKR vs PBKS, IPL 2023 Live: कोलकाता आणि पंजाबमध्ये काटें की टक्कर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Background

IPL 2023, Match 53, KKR vs PBKS: आज आयपीएल 2023 (IPL 2023) मधील 53 वा सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात पाहायला मिळणार आहे. कोलकाताच्या घरच्या मैदानावर आज 8 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. मागील सामन्यात पंजाब किंग्सला मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या शेवटच्या सामन्यात हैदराबादवर विजय मिळवला आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघांना आगामी सामने जिंकणं गरजेचं आहे.     

KKR vs PBKS, IPL 2023 Match 53 : कोलकाता विरुद्ध पंजाब
कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आयपीएल 2023 आतापर्यंत खेळलेल्या दहा सामन्यांपैकी चार सामन्यांत विजय मिळवून गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी कोलकाताला उर्वरित सामने जिंकणे आवश्यक आहे. मागील सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर पाच धावांनी विजय मिळवला.

पंजाब किंग्सने (PBKS) आतापर्यंतच्या दहापैकी पाच सामने जिंकले आहेत. सध्या पंजाब संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मागील सामन्यात पंजाबला पराभव पत्करावा लागला. आगामी सामने जिंकल्यास पंजाबला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. त्यामुळे दोन्ही संघांमधील आजचा सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे.


KKR vs PBKS Head to Head : पंजाब विरुद्ध कोलकाता हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) संघ एकूण 31 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये कोलकाता संघ वरचढ ठरला आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाने 20 सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्स संघाला 11 सामने जिंकता आले आहेत. आयपीएल 2023 मध्येही हे दोन संघ आमने-सामने आले होते. या सामन्यात पंजाबने कोलकाताचा 7 धावांनी पराभव केला. पराभवाचा वचपा काढण्याची संधी आज कोलकाता संघाला मिळणार आहे.

कोलकाता पराभवाचा वचपा काढणार?
आयपीएल 2023 मधील दुसऱ्या सामन्यात (IPL 2023 Match 2) पंजाब आणि कोलकाता संघांमध्ये लढत पाहायला मिळाली होती. या सामन्यात कोलकातावर पंजाबने सात धावांनी विजय मिळवला. आयपीएल गुणतालिकेत पंजाब किंग्स सातव्या तर कोलकाता नाईट रायडर्स आठव्या क्रमांकावर आहे. पंजाब संघाकडे 10 गुण तर कोलकाता संघाकडे 8 गुण आहेत. दोन्गी संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.

Eden Gardens Pitch Report : ईडन गार्डनची खेळपट्टी कशी आहे?
आज पंजाब (PBKS) आणि कोलकाता (KKR) यांच्यातील सामना कोलकाताच्या घरच्या ईडन गार्डन मैदानावर पार पडणार आहे. ईडन गार्डन स्टेडिअमची (Eden Gardens) खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या स्टेडियमच्या लहान आकारामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळते. दरम्यान, या मैदानावर दव महत्त्वाची भूमिका बजावते. दव पडल्यानंतर फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर मदत मिळू लागते, त्यानंतर धावा काढणं कठीण होतं.

IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
कोलकाता (KKR) आणि पंजाब (PBKS) यांच्यात आज 7 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

KKR vs PBKS Playing 11 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11

KKR Probable Playing 11 : कोलकाता नाईट रायडर्स

रिंकू सिंह, जेसन रॉय, नितीश राणा (कर्णधार), आंद्र रसेल, सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, हर्षित राणा.

PBKS Probable Playing 11 : पंजाब किंग्स

शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, सॅम करन, शिखर धवन, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, प्रभसिमरन सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), राहुल चहर, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंह.



 

 

23:27 PM (IST)  •  08 May 2023

सिंग इज किंग... रिंकूने अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत पंजाबला हरवले

 

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकात्याने थरारक विजय मिळवला. अखेरच्या षटकात सहा धावांची गरज असताना अर्शदीप याने भेदक मारा केला.. पण रिंकू सिंहने अखेरच्या चेंडूवर षटकार लगावत कोलकात्याला विजय मिळवून दिला. दोन चेंडूत दोन धावांची गरज असताना आंद्रे रसेल धावबाद झाला.. त्यामुळे रिंकूवर दबाव होता.. पण रिंकूने दबाव न घेता अर्शदीपच्या अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत पंजाबला पराभवाची चव चाखायला लावली. 

शिखर धवनच्या अर्धशतकाच्या बळावर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 179 धावांपर्यंत मजल मारली होती. पंजाबने दिलेल्या 180 धावांचे आव्हान कोलकात्याने अखेरच्या चेंडूवर पार केले. कोलकात्याकडून कर्णधार नीतीश राणा याने अर्धशतकी खेळी केली. तर आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह यांनी वादळी फलंदाजी करत कोलकात्याला विजय मिळवून दिला. 

 

23:23 PM (IST)  •  08 May 2023

कोलकात्याचा पंजाबवर विजय

कोलकात्याचा पंजाबवर विजय... अखेरच्या चेंडूवर रिंकूने मारला चौकार

23:14 PM (IST)  •  08 May 2023

रसेल शो...

आंद्रे रसेल याने आक्रमक फलंदाजी करत कोलकात्याची विजयाकडे आगेकूच केली.

23:02 PM (IST)  •  08 May 2023

कोलकात्याला चौथा धक्का

कर्णधार नीतीश राणा 51 धावांवर बाद झालाय.

22:48 PM (IST)  •  08 May 2023

कोलकात्याला तिसरा धक्का

वेंकटेश अय्यर 11 धावांवर बाद झालाय

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget