अय्यर हो म्हण... नाव 'बबीता जी' ठेवते, श्रेयसला भर मैदानात तरुणीनं केलं प्रपोज, फोटो व्हायरल
shreyas Iyer, IPL 2022 : गुजरातविरोधातील सामन्यादरम्यान कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरला एका तरुणीनं प्रपोज केले.
IPL 2022: आयपीएलच्या 15 व्या हंगमात श्रेयस अय्यर कोलकाता संघाचं कर्णधारपद सांभाळत आहे. श्रेयसने आतापर्यंत आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली असून फलंदाजीतही आपला दबदबा निर्माण केलाय. त्यामुळे अनेकजण श्रेयसचे चाहते बनलेत. सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरला पुन्हा एकदा तरुणीने प्रपोज केले आहे. गुजरातविरोधातील सामन्यादरम्यान कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरला एका तरुणीनं प्रपोज केले. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोलकात्यानेही आपल्या अधिकृत सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केला आहे.
तरुणीने हातात घेतल्या पोस्टरवर श्रेयसला लग्नाची मागणी घातली आहे. तरुणीने हातात धरलेल्या पोस्टरवर लिहिलेय की, 'जर श्रेयस अय्यर माझं प्रपोजल स्विकारत असेल तर मी माझं नाव बबीता जी ठेवू शकते. ' हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बबिता आणि अय्यर ही जोडी कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील प्रसिद्ध पात्र आहेत. याच आधारावर हे पोस्टर तयार करण्यात आले आहे. कोलकत्ता नाईट रायडर्सने देखील त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केलं आहे.
View this post on Instagram
दरम्यान याआधीही श्रेयस अय्यरला तरुणीने मैदानात लग्नाची मागणी घातली होती. आयपीएलमधील 30 व्या सामन्यात श्रेयस अय्यरला लग्नाची मागणी घातली होती. ब्रेबॉर्न स्टेडियम एक महिला चाहती एक बोर्ड घेऊन उभी होती. त्या बोर्डवर तिने एक संदेश लिहून श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) लग्नाची मागणी (Marriage Proposal) घातली होती. त्या बोर्डवर लिहिले होते की, ‘माझ्या आईने सांगितले आहे की, लग्नासाठी मुलगा शोध, तर श्रेयस अय्यर तू माझ्याशी लग्न करशील का?’
That's one way of shooting your shot! 👏#KKRHaiTaiyaar #RRvKKR #IPL2022 pic.twitter.com/FDaO7VOXdx
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 18, 2022
दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स (KKR vs GT)या दोन्ही संघात आज सामना पार पडला. हा सामना अवघ्या 8 धावांनी जिंकत गुजरातने स्पर्धेतील सहावा विजय मिळवत पुन्हा गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवलं आहे. सामन्यात दोन्ही संघानी उत्तम कामगिरी केली. यावेळी आंद्रे रस्सेल याने अप्रतिम अष्टपैलू खेळीचं दर्शन घडवलं खरं पण अखेरच्या षटकात तो निर्धारित लक्ष्य गाठू न शकल्याने केकेआरने थोडक्यात सामना गमावला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात संघाने कर्णधार हार्दिकच्या खेळीच्या जोरावर कोलकात्यासमोर 157 धावांचे आव्हान ठेवले होते. ज्यानंतर केकेआर 20 षटकात 148 धावाच करु शकला.