Kavya Maran Angry : हर्षल पटेलकडून मोठी चुक! काव्या मारनचा संयम सुटला, रागाच्या भरात केले 'हे' कृत्य, कॅमेऱ्यात झालं कैद, VIDEO
आयपीएल 2025 चा 43 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे.

Kavya Maran Angry Reaction Harshal Patel : आयपीएल 2025 चा 43 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीची संधी दिली. पण, चेन्नईची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. त्यांनी पॉवरप्लेमध्येच 3 महत्त्वाच्या विकेट गमावल्या.
यानंतर, सातव्या षटकात रवींद्र जडेजाला आऊट करून चेन्नईला चौथा धक्का देण्याची संधी होती, पण हर्षल पटेलने एक सोपा झेल सोडला आणि जड्डूला जीवनदान मिळाले. हर्षलने झेल सोडला तेव्हा सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनचा संयम सुटला आणि तिने खूप रागाने प्रतिक्रिया दिली. ज्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काव्या मारन हर्षल पटेलवर संतापली...
खरंतर, झीशान अन्सारी चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील सातवे षटक टाकत होता. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रवींद्र जडेजाने चेंडू हवेत लाँग-ऑफच्या दिशेने शॉट मारला, पण तो चुकला. हर्षल पटेल तिथे उपस्थित होता आणि चेंडू थेट त्याच्याकडे गेला. हर्षलने दोन्ही हातांनी चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो ही चुकला. कॅच सुटताच काव्या खूप रागावलेली दिसली आणि काहीतरी बोलत असताना तिने तोंड फिरवले.
Kavya Maran Reaction For Harshal Patel Catch Drop 😂#CSKvsSRH pic.twitter.com/IC24VWMHYm
— SATYA ᴿᶜᴮ 🚩 (@sidhufromnaayak) April 25, 2025
काव्या मारन आणि तिच्या संघाचे मोठे चाहते आहे आणि ती जवळजवळ प्रत्येक सामन्यात स्टेडियममध्ये येते. या काळात ती खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीचे कौतुकही करते, पण बऱ्याचदा तिला खराब कामगिरीवर राग येतानाही दिसले आहे.
लाईफलाईनचा फायदा घेऊ शकला नाही रवींद्र जडेजा....
चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी खेळाडू रवींद्र जडेजा फलंदाजी करताना मिळालेल्या आयुष्याचा फारसा उपयोग करू शकला नाही. डावाच्या 10 व्या षटकात कामिंदू मेंडिसचा आऊट झाला. कामिंदूने विकेटच्या भोवतीच्या कोनातून चेंडू टाकला आणि जडेजा बाद झाला. अशाप्रकारे त्याने 17 चेंडूत 21 धावा केल्या.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन :
अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, कामिंडू मेंडिस, पॅट कमिन्स, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, जीशान अन्सारी, मोहम्मद शमी
हे ही वाचा -





















