एक्स्प्लोर

देशांतर्गत क्रिकेटमधून नाणेफेक हद्दपार? बॅटिंग- बॉलिंगचा निर्णय कसा होणार? IPL मधील इम्पॅक्ट प्लेअर बंद होणार? जय शाहांचे संकेत

Jay Shah: बीसीसीआयनं देशांतर्गत क्रिकेटमधील नाणेफेक बंद करण्याबाबत विचार सुरु केला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी तसे संकेत दिले आहेत. 

BCCI On New Toss Rule नवी दिल्ली: भारतातील देशांतर्गत क्रिकेटमध्ये लवकरच मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटमध्ये नाणेफेक बंद करण्याच्या विचारात आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटमधून टॉस पूर्णपणे बंद करण्यासंदर्भात पावलं टाकणार असून प्रायोगिक पातळीवर याचा प्रयोग सीके नायुडू ट्रॉफीत केला जाऊ शकतो. बीसीसीआयनं नियम बदलल्यास पाहुण्या संघाला बॉलिंग आणि बॅटिंग करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असेल. काही संघ त्यांना फायदेशीर ठरेल अशी खेळपट्टी बनवून त्याचा फायदा घेत असल्याचं समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात येऊ शकतो.  आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेअर नियमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर त्याबद्दल फेरविचार देखील केला जाऊ शकतो. 

बीसीसीआय कोणते बदल करणार?

नाणेफेक बंद करण्याशिवाय बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटचं वेळापत्रक बदलण्याची शक्यता आहे. यामुळं दोन देशांतर्गत मॅचसाठी अधिक वेळ उपलब्ध होईल. गेल्या वर्षी काही संघांच्या कर्णधारांनी दोन मॅचेसमधील कालावधी वाढवण्याची मागणी  केली होती. जय शाह यांनी यासंदर्भात माहिती दिल्यानंतर बीसीसीआयकडून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. जय शाह म्हणाले की सीके नायुडू ट्रॉफीतून टॉस हटवला जाईल.  याशिवाय  पाहुण्या संघाकडे पहिल्यांदा बॅटिंग करणार की बॉलिंग याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार असेल. सीके नायुडू ट्रॉफी पासून नवी गुणपद्धती देखील लागू करण्यात येणार आहे.  

आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेअर नियम बंद होणार?

बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटमधील नियमांमधील बदलांसह आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेअर नियमावर देखील मोठा निर्णय घेऊ शकते. इम्पॅक्ट प्लेअर नियम 2024 च्या आयपीएलमध्ये लागू असून या नियमाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.त्यामुलं बीसीसीआय याबाबत देखील मोठा निर्णय घेईल. बीसीसीआय इम्पॅक्ट प्लेअर नियम रद्द देखील करेल. 

जय शाह यांनी इम्पॅक्ट प्लेअर नियम प्रायोगिक तत्वावर लागू केला होता अशी माहिती दिली. आता या नियमावर विचार करण्याची वेळ आली आहे, असं ते म्हणाले. त्यामुळं बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटमध्ये टॉस बंद करणे, आयपीएल इम्पॅक्ट प्लेअर नियम रद्द करण्याबाबत निर्णय कधी घेणार हे पाहावं लागेल.  

संबंधित बातम्या : 

 गोंधळात गोंधळ,रोहित इम्पॅक्ट प्लेअर असून सब्स्टीट्यूट फील्डर बनला,मुंबईच्या कोचचा पंचांसोबत वाद, हार्दिकची मध्यस्थी 

Rohit Sharma : रोहित शर्माच्या मनात नेमकं काय? व्हायरल व्हिडीओनंतर केकेआरच्या प्रशिक्षक ,खेळाडूंसोबत बैठक, वेगळं पाऊल टाकणार? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget