IPL मध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे फिरकीपटू कोण?
IPL 2022 Marathi News : सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद विकेट घेण्याचा आगळावेगळा विक्रम सुचितच्या नावावर झाला.
Jagadeesha Suchith, IPL 2022 : वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या आयपीएलच्या 54 व्या सामन्यात आरसीबीने हैदराबादचा 67 धावांनी पराभव केला. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्याच चेंडूवर विराट कोहली गोल्डन डकचा शिकार झाला. जगदिश सुचितने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. यासह सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद विकेट घेण्याचा आगळावेगळा विक्रम सुचितच्या नावावर झाला. असा कारनामा करणारा जगदिश सुचित तिसरा फिरकीपटू ठरला.
हैदराबादकडून पहिलं षटक फिरकीपटू सुचितने टाकले. त्याने पहिल्याच चेंडूवर आरसीबीच्या माजी कर्णधाराला बाद केले. विराट कोहलीने मारलेला फटका थेट विल्यमसनच्या हातात गेला.. विल्यमसनने कोणताही चूक केली नाही. विराट कोहली शून्यवार बाद झाला. यंदाच्या हंगामात शून्यावर बाद होण्याची कोहलीची ही तिसरी वेळ होय.
आयपीएलच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे फिरकी गोलंदाज -
पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा सुचित तिसरा फिरकीपटू ठरलाय. याआधी केविन पीटरसन, मार्लन सॅमुअल्सने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली होती.
केविन पीटरसन, डरबन: वर्ष 2009
मार्लन सॅमुअल्स, कटक: वर्ष 2012
जे सुचित, वानखेड़े स्टेडियम मुंबई: वर्ष 2022
दरम्यान, वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात आरसीबीने हैदराबादचा 67 धावांनी पराभव केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 192 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरदाखल मैदानात उतरणाऱ्या हैदराबादचा संघ वानंदु हसरंगाच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. हसरंगाच्या फिरकीपुढे हैदराबादचा डाव 125 धावांत संपुष्टात आला. वानंदु हसरंगाने पाच विकेट घेतल्या.
हे देखील वाचा-