एक्स्प्लोर

MI vs LSG : बुमराह असूनही ही स्थिती, हार्दिक पांड्याच्या चुका, इरफान पठाणकडून मुंबईच्या खराब कामगिरीची पोलखोल

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या याच्यावर इरफान पठाणनं टीका केली आहे. मुंबईच्या खराब कामगिरीला हार्दिकच्या चुका जबाबदार असल्याचं तो म्हणाला.

MI vs LSG, IPL 2024 : लखनौमधील एकाना स्पोर्टर्स स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2024 मधील 48 व्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव झाला. लखनौ सुपर जाएंटसनं (Lucknow Super Giants) मुंबई इंडियन्सचा चार विकेट राखून पराभव केला. मुंबई इंडियन्सच्याया कामगिरीवर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर ऑलराऊंडर इरफान पठाणनं (Irfan Pathan) परखड भाष्य केलंय. इरफान पठाणनं मुंबई इंडियन्सच्या पराभवांच्या मालिकेला हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) चुकांना जबाबदार धरलं आहे. मुंबई इंडियन्सचा यंदाच्या आयपीएलमध्ये सातवा पराभव झाला.  

मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 विकेटच्या मोबदल्यात 144 धावा केल्या होत्या. लखनौच्या गोलंदाजांनी मुंबईला सुरुवातीला धक्के दिल्यानंतर नेहाल वढेरा यानं 45 आणि टीम डेविड यानं 35 धावा करत डाव सावरला. लखनौनं मुंबईनं दिलेलं आव्हान 6 विकेटच्या मोबदल्यात पार केलं. मार्क स्टॉयनिसची अर्धशतकी खेळी, केएल राहुल, दीपक हुड्डा आणि निकोलस पूरन यांच्या खेळीनं लखनौच्या विजयाचा मार्ग सुकर केला. लखनौ सुपर जाएंटसनं 19 व्या ओव्हरमध्ये विजयाला गवसणी घातली. मुंबई इंडियन्सचा स्पर्धेतील आणखी एक पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यानं मुंबईच्या या स्थितीला हार्दिक पांड्याच्या चुकांना जबाबदार धरलं आहे.

इरफान पठाण काय म्हणाला?

मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर इरफान पठाण म्हणतो, मुंबई इंडियन्सची टीम गेल्या वर्षी क्वालिफाई करु शकली नव्हती कारण पूर्ण हंगामात जसप्रीत बुमराह खेळला नव्हता. मात्र, यावेळी तो संघात असून देखील ही स्थिती आहे. मैदानावर संघाचं व्यवस्थापन योग्यपणे केलं जात नसल्यानं ही स्थिती ओढवली आहे. कॅप्टन हार्दिक  पांड्यानं अनेक चुका केल्या आहेत आणि हेच सत्य आहे, असं इरफान पठाण म्हणाला. 

मुंबई इंडियन्सनं यंदा रोहित शर्माच्या जागी नेतृत्त्वाची धुरा हार्दिक  पांड्याकडे सोपवली होती. हार्दिक पांड्याला मैदानांवर प्रेक्षकांकडून शेरेबाजीला सामोरं जावं लागलं होतं. याचा परिणाम देखील हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर झालेला दिसतो. हार्दिकनं 10 मॅचमध्ये 21.88 च्या सरासरीनं 197 धावा केल्या होत्या. 

मुंबई इंडियन्सचा सातवा पराभव

मुंबई इंडियन्सचा यंदाच्या आयपीएल मधील सातवा पराभव झाला. मुंबई इंडियन्सला आतापर्यंत केवळ तीन मॅचेसमध्ये विजय मिळवता आलेला आहे. मुंबई गुणतालिकेत नवव्या स्थानावर असून त्यांची प्लेऑफसची वाट खडतर झाली आहे.  

संबंधित बातम्या :

MI Playoff Chances : 7 पराभवानंतर मुंबईचं प्लेऑफमधील आव्हान संपलं? जाणून घ्या MI ची संधी

मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं आव्हान खडतर, 10 सामन्यात सातव्या पराभवाची नोंद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget